२.१२ लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:46+5:302021-07-18T04:07:46+5:30
उमरेड : घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा एकूण २ लाख १२ ...

२.१२ लाखाचा ऐवज लंपास
उमरेड : घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना उमरेड शहरात गुरुवारी (दि. १५) मध्यरात्री घडली.
शांपू बापूराव वरधने (३२, रा. बालाजी नगर, उमरेड) हे वेकाेली मरुपार येथे नाेकरी करीत असल्याने ते गुरुवारी रात्री कामावर गेले हाेते. त्यांची पत्नी माहेरी गेल्याने घरी कुणीही नव्हते. त्यामुळे चाेरट्याने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला आणि कपाटातील १ लाख ९९ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने व १३ हजार रुपये राेख असा एकूण २ लाख १२ हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पाेबारा केला. ते शुक्रवारी (दि. १६) दुपारी घरी आले असता, चाेरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रशांत खाेब्रागडे करीत आहेत.