मेडिट्रिना हॉस्पिटलमधून रुग्ण महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:09 IST2021-09-13T04:09:07+5:302021-09-13T04:09:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तपासणी आणि उपचारांसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडी रुग्णालयातून चोरट्याने लंपास केली. ...

Lampas the patient's jewelry from Meditrina Hospital | मेडिट्रिना हॉस्पिटलमधून रुग्ण महिलेचे दागिने लंपास

मेडिट्रिना हॉस्पिटलमधून रुग्ण महिलेचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तपासणी आणि उपचारांसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडी रुग्णालयातून चोरट्याने लंपास केली. रामदास पेठेतील मेेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या चोरीच्या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

स्मिता विनायक होले (वय ४६) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या महालक्ष्मीनगरात राहतात. त्यांची आई इंदुमती यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना २६ ऑगस्टला सकाळी स्मिता होले यांनी मेडिट्रिनात आणले होते. तेव्हापासून दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत इंदुमती यांना एमआरआयसाठी नेताना त्यांच्या हातातील ६० हजारांची बांगडी बाजूला काढून ठेवण्यात आली होती. ती चोरट्याने लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्मिता कोल्हे यांनी रुग्णालय प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र, प्रशासनाने कानावर हात ठेवले. त्यामुळे होले यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: Lampas the patient's jewelry from Meditrina Hospital