८१ हजार रुपयाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:37+5:302021-07-05T04:07:37+5:30

कामठी : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ८१ हजार ७७५ रुपये किमतीचा ऐवज चाेरून ...

Lampas looted Rs 81,000 | ८१ हजार रुपयाचा ऐवज लंपास

८१ हजार रुपयाचा ऐवज लंपास

कामठी : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ८१ हजार ७७५ रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सईदनगर, रनाळा येथे शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.

आरिफ अहमद अन्सारी (४१, रा. सईदनगर, रनाळा, ता. कामठी) हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. घरी कुणीही नसल्याचे हेरून चाेरट्याने दाराचे कुलूप व कडी ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील ६१ हजार ७७५ रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये राेख असा एकूण ८१ हजार ७७५ रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. हा प्रकार लक्षात येताच आरिफ अहमद अन्सारी यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८०, ४५४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Lampas looted Rs 81,000