२.५७ लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:13 IST2021-01-16T04:13:08+5:302021-01-16T04:13:08+5:30

जलालखेडा : चाेरट्याने दाेन ठिकाणी घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम, माेटरसायकल व इतर साहित्य असा एकूण २ लाख ...

Lampas looted Rs 2.57 lakh | २.५७ लाखाचा ऐवज लंपास

२.५७ लाखाचा ऐवज लंपास

जलालखेडा : चाेरट्याने दाेन ठिकाणी घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम, माेटरसायकल व इतर साहित्य असा एकूण २ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर येथे घडली.

नितीन संभाजी बगवे (४०, रा. काटाेल) यांच्या सासू भिष्णूर, (ता. नरखेड) येथे राहतात. त्या कामानिमित्त काटाेल येथे गेल्या हाेत्या. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने त्यांच्या घराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने कपाटात असलेले दाेन लाख रुपये राेख, ४६ हजार ५०० रुपयांचे साेन्या-चांदीचे दागिने, पाच हजार रुपयांचा कॅमेरा, दाेन हजार रुपयांचे घड्याळ, दाेन हजार रुपयांचा सीडी प्लेयर, तसेच त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या बालाजी नामदेव कळंबे यांची (एमएच-३१/एटी-९७४६) क्रमांकाची माेटरसायकल असा एकूण २ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.

घरी चाेरी झाल्याचे स्पष्ट हाेताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत.

Web Title: Lampas looted Rs 2.57 lakh