राेख रकमेसह १६ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:08 IST2021-09-19T04:08:47+5:302021-09-19T04:08:47+5:30

माैदा : अज्ञात चाेरट्याने किराणा दुकानात चाेरी करून राेख १५ हजार रुपये, दाेन चांदीचे शिक्के व केराेसीन लायसन्स असा ...

Lampas looted Rs 16,000 with cash | राेख रकमेसह १६ हजारांचा ऐवज लंपास

राेख रकमेसह १६ हजारांचा ऐवज लंपास

माैदा : अज्ञात चाेरट्याने किराणा दुकानात चाेरी करून राेख १५ हजार रुपये, दाेन चांदीचे शिक्के व केराेसीन लायसन्स असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना माैदा येथे गुरुवारी (दि. १६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

रवींद्र गणपतराव सिंगनजुडे (५३, रा. माराेडी, ता. माैदा) यांच्या मालकीच्या किराणा दुकानाच्या दाराचे कुलूप ताेडून चाेरट्याने आत प्रवेश केला. यात दुकानातील लहान लाेखंडी पेटीमध्ये ठेवलेले राेख १५ हजार रुपये, एक हजार रुपये किमतीचे दाेन चांदीचे शिक्के तसेच केराेसीन लायसन्स असा एकूण १६ हजारांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच सिंगनजुडे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

Web Title: Lampas looted Rs 16,000 with cash