१.४२ लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:08 IST2021-07-27T04:08:58+5:302021-07-27T04:08:58+5:30

कामठी : चाेरट्याने कुलूपबंद घरात प्रवेश करीत १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना कामठी ...

Lampas looted Rs 1.42 lakh | १.४२ लाखाचा ऐवज लंपास

१.४२ लाखाचा ऐवज लंपास

कामठी : चाेरट्याने कुलूपबंद घरात प्रवेश करीत १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील येरखेडा येथे रात्री घडली.

शाहीद अब्दुल वहिद खान (३७, रा. बीबी कॉलनी, न्यू येरखेडा, ता. कामठी) हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील ३८ हजार रुपये राेख, ३५ हजार रुपयांचे दाेन लॅपटाॅप, २४ हजार रुपयांची घड्याळ, १५ हजार रुपयांचा कॅमेरा, ५,५०० रुपयांच्या दाेन घड्याळी, १८ हजार रुपयांच्या साेन्याच्या दाेन अंगठ्या व मुलीने बचत केलेले सात हजार रुपये असा एकूण १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत.

Web Title: Lampas looted Rs 1.42 lakh