कुही : देवदर्शनासाठी मूळ गावी आलेल्या महिलेच्या बॅगेतून अज्ञात चाेरट्याने साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वग येथे नुकतीच घडली.
वनमाला हरिश्चंद्र तितरमारे (४८, रा. वग, ता. कुही) या कुलदैवतेच्या पूजेसाठी वग येथे आल्या हाेत्या. त्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून अज्ञात चाेरट्याने त्यांच्या बॅगमधून ५० हजार रुपये किमतीचे साेन्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची साेन्याची अंगठी किमत ७,००० रुपये आणि राेख ५,००० रुपये असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन आराेपीने पाेबारा केला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक अनिल देरकर करीत आहेत.