दागिन्यांसह राेख रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:13 IST2021-08-20T04:13:15+5:302021-08-20T04:13:15+5:30

काटाेल : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही ...

Lampas with jewelry | दागिन्यांसह राेख रक्कम लंपास

दागिन्यांसह राेख रक्कम लंपास

काटाेल : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काटाेल शहरात नुकतीच घडली.

ऋषिकेश रामचंद्र उईके (२१, रा. आययूडीपी, काटाेल) हा त्याच्या कुटुंबीयांसह हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे गेला हाेता. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने ३० हजार रुपयांची साेन्याची अंगठी व २० हजार रुपये राेख असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. शेजाऱ्यांना त्याच्या घराचेे दार उघडे असल्याने त्यांनी ऋषिकेशला कळविले. त्यामुळे घरी चाेरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक संताेष आंधळे करीत आहेत.

Web Title: Lampas with jewelry