२६ हजारांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:55+5:302021-07-07T04:10:55+5:30

खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत जुने मंगळसूत्र व साेन्याचे दागिने लंपास केले. त्या दागिन्यांची किंमत २६ हजार ४०० ...

Lampas with jewelery worth Rs 26,000 | २६ हजारांचे दागिने लंपास

२६ हजारांचे दागिने लंपास

खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत जुने मंगळसूत्र व साेन्याचे दागिने लंपास केले. त्या दागिन्यांची किंमत २६ हजार ४०० रुपये आहे. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभाेलेनगर, चनकापूर येथे साेमवारी (दि. ५) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.

प्रमाेद भाऊराव काटे (वय ३६, रा. चनकापूर) हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने घराच्या समाेरील दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील बेडरूममधील लाेखंडी कपाटाच्या लाॅकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले २४ हजार रुपये किमतीचे जुने मंगळसूत्र व तीन ग्रॅमचे साेन्याचे डाेरले किंमत २,४०० रुपये असे एकूण २६ हजार ४०० रुपयांचे दागिने चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच काटे यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, चाेरट्याचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार जडते करीत आहेत.

Web Title: Lampas with jewelery worth Rs 26,000