डॉक्टरकडे धाडसी घरफोडी, सोन्याचे दागिने आणि डायमंड सेट लंपास
By Admin | Updated: April 18, 2017 22:27 IST2017-04-18T22:27:04+5:302017-04-18T22:27:04+5:30
धंतोलीत राहणा-या एका डॉक्टर दाम्पत्याकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. त्यांच्याकडून हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाखांचा ऐवज चोरून नेला.

डॉक्टरकडे धाडसी घरफोडी, सोन्याचे दागिने आणि डायमंड सेट लंपास
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 18 - धंतोलीत राहणा-या एका डॉक्टर दाम्पत्याकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. त्यांच्याकडून हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाखांचा ऐवज चोरून नेला.
मूळचे अकोला येथील रहिवासी असलेले डॉ. इकरार राजा इसरार राजा (वय २९) हे काँग्रेसनगरातील कुबेर रिजेन्सीमध्ये राहतात. ७ ते १६ एप्रिलच्या दरम्यान त्यांच्या सदनिकेतील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि डायमंड सेट असे एकूण पाच लाख सात हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार रविवारी लक्षात आल्यानंतर डॉ. इकरार राजा यांनी धंतोली पोलिसांना कळविले. पोलिसांनी चौकशीनंतर घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी डॉक्टरच्या सदनिकेत पोलिसांनी पुन्हा एकदा तपासणी केली. चोरटा नेहमीच्या संपर्कातील असावा, असा संशय असून पोलीस त्यासंबंधाने तपास करीत आहेत.