गुटखा विक्रीच्या नावावर दाेन लाख रुपये लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:44+5:302021-09-03T04:08:44+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : अनाेळखी दाेघांनी पाचगाव (ता. उमरेड) येथील किरणा दुकानात जाऊन दुकानदारास प्रतिबंधित गुटखा व सुगंधित ...

Lakhs of rupees were laundered in the name of selling gutkha | गुटखा विक्रीच्या नावावर दाेन लाख रुपये लाटले

गुटखा विक्रीच्या नावावर दाेन लाख रुपये लाटले

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : अनाेळखी दाेघांनी पाचगाव (ता. उमरेड) येथील किरणा दुकानात जाऊन दुकानदारास प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीच्या नावाखाली सहा लाख रुपयाची मागणी केली. दुकानदाराने कारवाई टाळण्यासाठी तीन लाख रुपये देण्याचे मान्य करीत वेळेवर दाेन लाख रुपये दिले व एक लाख रुपये दुसऱ्या दिवशी देणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात दाेघांना अटक करण्यात आली आहे.

कुणाल संजय मेश्राम (३०, रा. जगजीवननगर, नागपूर) व मंगल भीमराव सुरटकर (४१, रा. महादुला-काेराडी राेड, नागपूर), अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. किसना पुरुषाेत्तम येळणे (४५, रा. पाचगाव, ता. उमरेड) यांचे पाचगाव येथे किराणा दुकान आहे. कुणाव व मंगल शनिवारी (दि. २८ ऑगस्ट) दुपारी १ वाजता व रविवारी (दि. २९ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्याच्या दुकानात आले हाेते. तत्पूर्वी, त्यांनी किसना येळणे यांच्या दुकानातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची खात्री पटवून घेतली हाेती. या दाेघांनीही किसना यांचा भाऊ याेगेश यास जबरदस्तीने खुर्चीवर बसविले आणि त्याच्याकडील माेबाईल स्वत:च्या ताब्यात घेतला. त्यांनी दुकानातील साहित्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा शाेध घ्यायला सुरुवात केली.

त्यांना दुकानात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून येताच याबाबत अन्न व औषधी प्रशासन तसेच पाेलिसांना माहिती देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली. वाटाघाटीत तीन लाख रुपये देण्याचे किसना येळणे यांनी मान्य केले व रविवारी दाेघांनीही त्यांच्याकडून बळजबरीने दाेन लाख रुपये घेतले. उर्वरित एक लाख रुपये दुसऱ्या दिवशी म्हणजेच साेमवारी न दिल्यास हा प्रकार अन्न व औषधी प्रशासन व पाेलिसांना सांगण्याची धमकीही दिली. दाेघांनीही साेमवारी किसना येळणे यांना फाेन करून एक लाख रुपयाची मागणी केली. बदनामीमुळे ते घाबरले हाेते. त्यामुळे त्यांनी हा प्रकार घनश्याम वैद्य यांना सांगितला. वैद्य यांनी त्यांना धीर देत पाेलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना केली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून भादंवि ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला व दाेघांनाही अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक तथा ठाणेदार चंद्रकांत मदने करीत आहेत.

...

तीन दिवसाची पाेलीस काेठडी

या दाेन्ही आराेपींना अटक केल्यानंतर कुही पाेलिसांनी गुरुवारी (दि. २) कुही येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी. यू. राजपूत यांच्या न्यायालयासमाेर हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची म्हणजेच शनिवार(दि.४)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. पाेलिसांनी या दाेघांकडून काेणतेही साहित्य अथवा राेख रक्कम जप्त केली नाही. त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली कार पाचगाव पाेलीस चाैकीत जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, कार त्यांची नसल्याचे सांगून जप्त केले नसल्याचेही पाेलिसांनी सांगितले.

...

दाेन्ही आराेपींचा पीसीआर (पाेलीस कस्टडी रिमांड) घेतला असून, त्यांच्याकडून अद्याप काेणतेही साहित्य ताब्यात घेतले नाही. त्यांची ओळख परेड व्हायची असल्याने आरोपींचे फोटोसुद्धा काढले नाही. गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन (कार) त्यांचे नाही. त्यामुळे ते वाहनसुद्धा ताब्यात घेतले नाही.

- चंद्रकांत मदने, ठाणेदार,

पाेलीस ठाणे, कुही.

Web Title: Lakhs of rupees were laundered in the name of selling gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.