लाेखंड चाेरटे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST2021-05-21T04:08:36+5:302021-05-21T04:08:36+5:30

उमरेड : वेकोलि येथील सैनी कंपनीमध्ये लोखंड चोरीच्या प्रकरणात चार चोरट्यांना उमरेड पोलिसांनी अटक केली. निकेश देवराव मिसाळ (२९), ...

Lakhand arrested four times | लाेखंड चाेरटे अटकेत

लाेखंड चाेरटे अटकेत

उमरेड : वेकोलि येथील सैनी कंपनीमध्ये लोखंड चोरीच्या प्रकरणात चार चोरट्यांना उमरेड पोलिसांनी अटक केली. निकेश देवराव मिसाळ (२९), अंकित चिंतामण भुसारी (२०), चंदू उदाराम नांदूरकर (२२) तिन्ही रा. उमरेड आणि गौरव पंकज मानकर (२०, रा. सेव, ता. उमरेड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चौघेही सुरक्षा कर्मचारी म्हणून सदर कंपनीत कार्यरत होते. ५ ते ६ टन सुमारे १ लाख १० हजार रुपये किंमतीचे लोखंड होते, अशी तक्रार प्रशांतकुमार सिंग यांनी कंपनीच्यावतीने नोंदविली आहे. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असल्याचीही बाब पुढे येत आहे. उमरेड पोलीस ठाण्यात भादंवि ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात हरीश यंगलवार करीत आहेत.

Web Title: Lakhand arrested four times