शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मजूर नसल्याचा परिणाम होतोय नागपूर जिल्ह्यातील टंचाईच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:57 IST

कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे.

ठळक मुद्दे६४४ पैकी ११७ बोअरचे झाले फ्लशिंग : मान्सूनच्या आगमनाने टंचाईची कामे प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे. मजूर नसल्यामुळे कामाची गती फारच संथ आहे. त्यातच मान्सून दाखल झाल्याने टंचाईची कामे प्रलंबित राहणार आहेत.यावर्षी टंचाईच्या कामामध्ये नादुरुस्त बोअरवेलला फ्लशिंग करून बोअर रिचार्ज करण्यावर भर देण्यात आला. जवळपास ६४४ बोअरला फ्लशिंग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जुन्या बोअरवेल पुन्हा पुनरुज्जीवित होऊन, त्याचा ग्रामीण नागरिकांना फायदा होणार होता. परंतु यंदा देशात कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे सर्वच कामे रखडलीत. त्यामुळे टंचाई आराखड्यातील कामांनाही मंजुरी मिळण्यास विलंब झाला. साधारणत: ३० जूनपर्यंत टंचाईची कामे मार्गी लावावी लागतात. परंतु यंदा मंजुरी उशिरा प्राप्त झाल्याने कामांनाही उशिरा सुरुवात झाली. त्यातच मजूर नसल्यामुळेही कामे रखडलीत. जिल्ह्यात प्रथमच ५११ गावांमधील ६४४ बोअरवेलला फ्लशिंग करण्याचे नियोजित आहे. परंतु आतापर्यंत केवळ ७७ गावांमधील ११७ बोअरवेलच्या फ्लशिंगचे काम पूर्ण झाले आहे.यंदा टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात ३७ कोटी ८० लक्ष रुपये प्रस्तावित होते. त्यामध्ये बोअरवेल फ्लशिंग, नवीन बोरअवेल, नळ योजना, विहिर खोलीकरण, विहिर अधिग्रहण आदी कामे करायची होती. त्यात १६० गावांमध्ये २३४ बोअरवेल करावयाच्या असून, आजवर त्यापैकी १७३ बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहेत. तर ३१ गावांमधील बोअरवेलला भूवैज्ञानिक विभागाकडून रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता केवळ ३० जूनपर्यंत ३० बोअरवेलचीच कामे मार्गी लावायची आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईLabourकामगारMigrationस्थलांतरण