मजुराचा राेलरखाली दबून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:21+5:302021-03-04T04:12:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : लाॅनमध्ये राेलरने गवत दाबून सपाटीकरण करीत असताना ताेल गेल्याने मजूर खाली काेसळला. त्यातच घाबरलेल्या ...

मजुराचा राेलरखाली दबून मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : लाॅनमध्ये राेलरने गवत दाबून सपाटीकरण करीत असताना ताेल गेल्याने मजूर खाली काेसळला. त्यातच घाबरलेल्या बैलांनी राेलर ओढला. ताे राेलर मजुराच्या अंगावरून देल्याने त्याखाली दबून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेराड शिवारात मंगळवारी (दि. २) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर माधवराव कडू (५४, रा. घोराड, ता. कळमेश्वर) असे मृत मजुराचे नाव आहे. कवडू सोमा चांभारे, रा. घोराड हे त्यांच्या घाेराड शिवारातील शेतात लाॅन ग्रास (गवत)ची निर्मिती करून ते विकतात. त्यांना शेतातील लाॅन ग्रासचे सपाटीकरण करावयाचे असल्याने त्यांनी ज्ञानेश्वर कडूू याला ३०० रुपये प्रति दिवसाप्रमाणे कामाला बाेलावले हाेते. ज्ञानेश्वरने मंगळवारी सकाळी लाेखंडी राेलरला बैलजाेडी जुंपली आणि सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात केली.
दरम्यान, काम सुरू असतानाच कशाच्या तरी आवाजाने बैल घाबरले आणि ताेल गेल्याने ज्ञानेश्वर खाली काेसळला. त्याचवेळी घाबरलेल्या बैलांनी राेलर जाेरात ओढल्याने ताे ज्ञानेश्वरच्या अंगावरून गेला. यात गंभीर दुखापत झाल्याने ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल राजेश वानखेडे व सचिन खरबडे करीत आहेत.