बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंडसाठी श्रमिक रेल्वे : संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:21 PM2020-05-19T22:21:42+5:302020-05-19T22:26:08+5:30

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

Labor Railways for Bihar, Uttar Pradesh, West Bengal, Jharkhand: Sanjeev Kumar | बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंडसाठी श्रमिक रेल्वे : संजीव कुमार

बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंडसाठी श्रमिक रेल्वे : संजीव कुमार

Next
ठळक मुद्देजिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यासाठीचे नियोजन करताना यापुढे संबंधित राज्याच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. तसेच श्रमिक रेल्वेचा संपूर्ण खर्च केंद्र शासनाच्यावतीने रेल्वेला अदा करण्यात येणार आहे.
प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आपली संपूर्ण माहिती द्यावी. यामध्ये दूरध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) आवश्यक आहे. आपल्या जाण्याच्या प्रवासानुसार संबंधित श्रमिक रेल्वे संबंधी संपूर्ण माहिती आपणास मोबाईलवर अथवा दूरध्वनीवर कळविण्यात येईल. यामध्ये जाण्याचा दिनांक, वेळ आदी संपूर्ण माहिती कळविण्यात येईल.

Web Title: Labor Railways for Bihar, Uttar Pradesh, West Bengal, Jharkhand: Sanjeev Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.