कुल्फी, आईस्क्रीम विक्रेते संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:22+5:302021-05-30T04:08:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : उन्हाळा म्हटला की कुल्फी, आईस्क्रीम व शीतपेयांची आवर्जून आठवण हाेते. या शीतपेयांच्या विक्रीत उन्हाळ्यामध्ये ...

Kulfi, ice cream vendors in crisis | कुल्फी, आईस्क्रीम विक्रेते संकटात

कुल्फी, आईस्क्रीम विक्रेते संकटात

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : उन्हाळा म्हटला की कुल्फी, आईस्क्रीम व शीतपेयांची आवर्जून आठवण हाेते. या शीतपेयांच्या विक्रीत उन्हाळ्यामध्ये आमूलाग्र वाढ हाेते. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे खापा (ता. सावनेर) शहरात या शीतपेयांची विक्री शून्यावर आल्याने शीतपेयांच्या विक्रेत्यांवर तसेच त्यांच्या उत्पादनात सहभागी असलेल्या कर्मचारी व कामगारांवर आर्थिक संकट काेसळले आहे.

उन्हाळ्यात कुल्फी, आईस्क्रीम, लस्सीची मागणी वाढत असल्याने याच्या विक्रीतून अनेकांना राेजगारही मिळताे. विशेष म्हणजे, साधी व मटका कुल्फी विकणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असते. यातून मिळणाऱ्या मिळकतीवर त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळताे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी केंद्र शासनाने मार्च २०२० मध्ये देशभर लाॅकडाऊन जाहीर केले. ते लाॅकडाऊन संपूर्ण उन्हाळाभर कायम राहिल्याने या विक्रेत्यांना कुल्फी विकणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या आशा २०२१ च्या उन्हाळ्यावर टिकून हाेत्या. याही उन्हाळ्यात राज्य शासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्याने त्यांच्या या आशेवर पाणी फेरले गेले.

कुल्फी व आईस्क्रीमच्या ग्राहकांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असते. काेराेना संक्रमणामुळे मुलांचे घराबाहेर पडणेही बंद आहे. शिवाय, थंड पदार्थ खाल्ल्याने सर्दी हाेण्याची शक्यता असल्याने पालकही मुलांना थंड पदार्थ खाण्यास मनाई करतात. लाॅकडाऊनमुळे कुल्फी विक्रेते राेडवर फिरत नसल्याने मुलांनाही या शीतपेयांची फारशी आठवण हाेत नाही. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या प्रत्येक घटकाचे आर्थिक कंबरडे माेडल्यागत झाले आहे.

...

सलग दाेन वर्षे नुकसान

काेराेना संक्रमण आणि ते राेखण्यासाठी शासनाने जाहीर केलेले लाॅकडाऊन यामुळे कुल्फी, आईस्क्रीम व लस्सी उत्पादक व विक्रेत्यांचे सलग दाेन वर्षे माेठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया खापा शहरातील लस्सी विक्रेते दिनेश कवडे यांनी व्यक्त केली. दाेन्ही उन्हाळ्यांमध्ये दुकान उघडणेही शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. काेराेना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करताना आराेग्याची काळजी घेण्यासाठी थंड व आंबट-गाेड पदार्थ खाणे टाळत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली.

Web Title: Kulfi, ice cream vendors in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.