वंदनासोबत ‘लिव्ह इन’मध्ये होता कृष्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:33+5:302021-07-12T04:07:33+5:30

नागपूर : दिवसाढवळ्या लुटमार करणारा उत्तर प्रदेश येथील गुन्हेगार कृष्णा पांडे व वंदना दीर्घ काळापासून ‘लिव्ह इन’मध्ये होते. त्यांनी ...

Krishna was in 'Live In' with Vandana | वंदनासोबत ‘लिव्ह इन’मध्ये होता कृष्णा

वंदनासोबत ‘लिव्ह इन’मध्ये होता कृष्णा

नागपूर : दिवसाढवळ्या लुटमार करणारा उत्तर प्रदेश येथील गुन्हेगार कृष्णा पांडे व वंदना दीर्घ काळापासून ‘लिव्ह इन’मध्ये होते. त्यांनी जरीपटका परिसरात खोली किरायाने घेतली होती. असे असताना वंदना कृष्णाच्या टोळीची माहिती लपवत आहे.

कृष्णासह इतर गुन्हेगारांनी ५ जुलै रोजी जरीपटक्यातील भीम चौक येथे अवनी ज्वेलर्सचे संचालक आशिष नावरे यांच्याजवळचे २० लाख ७३ हजार रुपयाचे दागिने लुटले. त्यानंतर पोलिसांनी केवळ आठ तासात वीरेंद्रकुमार यादव (२६, रा. मानिकपूर) व दीपक त्रिपाठी (२४, रा. अलाहाबाद) यांना मध्य प्रदेशातील कटनीतून अटक केली. परंतु, कृष्णा व पिंकू शुक्ला फरार झाले. सुरुवातीला आशिष यांनीच सीसीटीव्ही फुटेजवरून कृष्णा व वंदनाला ओळखले. त्यानंतर वंदनाला ७ जुलैला अटक करण्यात आली. तेव्हापासून तिला विचारपूस केली जात आहे. परंतु, ती सत्य लपवून ठेवत आहे. ती मूळ प्रतापगड येथील रहिवासी आहे. कृष्णा अनेक वर्षापासून गुन्हे करीत आहे. तो वंदनाला भेटण्यासाठी नेहमीच नागपूरला येत होता. तिच्यासोबत रहात होता. त्याने घटनेच्या एक दिवस आधी त्याच्या साथीदारांना जरीपटक्यातील खोलीत थांबवले होते. असे असताना वंदना स्वत:ला निर्दोष म्हणत आहे. तिला कृष्णाविषयी संपूर्ण माहिती असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्रिपाठी सध्या रुग्णालयात भरती असून यादव १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे. कृष्णाला अटक करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: Krishna was in 'Live In' with Vandana