मनपा केंद्रांमध्ये आज कोविशिल्ड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST2021-08-19T04:11:39+5:302021-08-19T04:11:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे गुरुवारी महापालिकेसह सरकारी केंद्रांवर १८ वर्षांवरील ...

Kovishield available today at Municipal Centers | मनपा केंद्रांमध्ये आज कोविशिल्ड उपलब्ध

मनपा केंद्रांमध्ये आज कोविशिल्ड उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे गुरुवारी महापालिकेसह सरकारी केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. या केंद्रांवर कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी नोंदणी करता येईल. तसेच ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावरही १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविशिल्डचे लसीकरण होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

वय १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कामठी रोड व स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, महापालिका स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाॅल येथे उपलब्ध आहे.

Web Title: Kovishield available today at Municipal Centers