कोविडवर उपचार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:57+5:302021-04-07T04:09:57+5:30
व्हॅक्सिन कुणी घेऊ नये : - इंजेक्शन, गोळ्या, अन्न पदार्थांची एनर्जी - गरोदर माता व स्तनदा माता - कोविड ...

कोविडवर उपचार आवश्यक
व्हॅक्सिन कुणी घेऊ नये :
- इंजेक्शन, गोळ्या, अन्न पदार्थांची एनर्जी
- गरोदर माता व स्तनदा माता
- कोविड संसर्ग असलेले
- कोविडच्या उपचारासाठी प्लाझमा थेरपी घेतलेल्यांनी
- मिरगी अशा मेंदूचा आजार असलेल्यांनी
- रक्तपेशींचा आजार असलेल्यांनी
प्रश्न : मी कोविड लसीकरण करू शकतो का?
सध्याच्या शासकीय नियमाप्रमाणे ज्यांचे वय ४५ वर्षे किंवा अधिक आहे, ते सर्व कोविड लसीकरणासाठी पात्र आहेत. याकरिता कुठल्याही डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
प्रश्न : मला कोविड झाला आहे. मी लसीकरण करू शकतो काय?
तुम्हाला जर कोविड निदान झाले आणि १४ दिवसांच्या विलगीकरणानंतर आणखी १४ दिवसांनी लसीकरणाचा पहिला डोस किंवा दुसरा डोस घेऊ शकता.
प्रश्न : मी कोविडपासून बरा झालो आहे. मला परत आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे का?
कोविड झालेल्या व्यक्तीची आरटीपीसीआर टेस्ट तीन महिन्यांपर्यंत पॉझिटिव्ह येऊ शकते. मृत विषाणू घशामध्ये असल्यामुळे ही तपासणी पॉझिटिव्ह राहू शकते. जर तुमचे सर्व लक्षणे बरे आले आणि तुमचा दहा दिवसांचा गृहविलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला असेल तर तुम्हाला आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही.
प्रश्न : माझी रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मला आरटीपीसीआर करण्याची गरज आहे का?
नाही. या दोन्ही टेस्ट कोविडच्या निदानासाठी आहेत. या तपासणीने रुग्ण संक्रमित आहे का, हे कळते. ज्यांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह आहे; पण लक्षणे असलेल्या रुग्णांनी आरटीपीसीआर करणे आवश्यक आहे.
खालील व्यक्तींना रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे
- गृहविलगीकरणाची पर्याप्त व्यवस्था घरी नसणे
- ६० वर्षांवरील कोविड रुग्ण किंवा ज्यांना कॅन्सर, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार
- ज्यांचे एसपीओ२ ९३ पेक्षा कमी आहे किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजन स्तर कमी होत आहे
- ज्यांना कोविडच्या निदानानंतर अतिशय कमजोरी आहे, जेवण होत नाही किंवा पाच दिवसानंतरही उपचारानंतर ताप कमी होत नाही
- सिटी स्कॅनमध्ये न्यूमोनिया आहे