कोलते यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार

By Admin | Updated: May 9, 2017 01:47 IST2017-05-09T01:47:49+5:302017-05-09T01:47:49+5:30

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथील कार्यालयात कार्यरत असलेले उपायुक्त (महसूल) डॉ. संजय जी. कोलते (भाप्रसे) यांची नागपूर विभागीय आयुक्त, कार्यालयात बदली झाल्यामुळे....

Kolte accepted the post of Commissioner | कोलते यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार

कोलते यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथील कार्यालयात कार्यरत असलेले उपायुक्त (महसूल) डॉ. संजय जी. कोलते (भाप्रसे) यांची नागपूर विभागीय आयुक्त, कार्यालयात बदली झाल्यामुळे त्यांनी आज सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथील आयुक्त (मनरेगा) या पदाचा कार्यभार अपर आयुक्त अरुण उन्हाळे यांच्याकडून स्वीकारला.
डॉ. संजय कोलते हे मूळचे जळगावचे आहेत. ते १९९४ कॅडरचे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांची १२ मार्च १९९४ रोजी प्रशासकीय सेवेत नियुक्ती झाली. त्यांनी जळगाव, नाशिक, धुळे, मुंबई, पुणे येथे विविध पदावर प्रशासकीय जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या असून त्यांना विविध क्षेत्रात पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

Web Title: Kolte accepted the post of Commissioner