हायप्रोफाईल डेटिंगचे कोलकाता कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:20 IST2017-08-21T01:20:05+5:302017-08-21T01:20:35+5:30

Kolkata connections for high-profile dating | हायप्रोफाईल डेटिंगचे कोलकाता कनेक्शन

हायप्रोफाईल डेटिंगचे कोलकाता कनेक्शन

ठळक मुद्देम्हणे डेटिंगला सरकारची मान्यता : कॉल सेंटरची नागपूरवर वक्रदृष्टी

जितेंद्र ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिताली, स्विटी असो वा नीलम. हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणाºया कंपन्यांच्या कॉल सेंटरवरील तरुणी तुमच्याशी गोड बोलून मैत्री वाढविते. एकदा का कुणी त्यांच्या जाळ्यात अडकला की तो खिसा रिकामा होईपर्यंत बाहेर पडत नाही. लोकमतने केलेल्या तपासात नागपुरातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसाचे कोलकाता कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे.
कॉल सेंटरवरील तरुणी त्यांनी सांगितलेल्या पॅकेजनुसार तुम्ही या व्यवसायात काम करण्यासाठी किंवा डेटींगची सेवा घेण्यासाठी इच्छुक असल्याचा विश्वास बसल्यावर तुम्हाला कंपनीची कार्यपद्धती समजावून सांगते. प्रस्तुत प्रतिनिधीने ‘टेक्नो इमर्ज’ या फोनो फ्रेंड कंपनीच्या कॉल सेंटवर काम करणाºया नीलम आणि बिशा तरुणीकडे या व्यवसायात काम करण्याची इच्छा दर्शविली असता त्यांनी तब्बल दोन दिवसाच्या संवादानंतर कंपनीच्या सर्व कार्यपद्धतीची माहिती दिली.
यात ‘टेक्नो इमर्ज’ या कंपनीला सरकारची मान्यता असून दरवर्षी इनकम टॅक्स भरण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे या व्यवसायात काम करताना कोणतीही रिस्क नाही. तुमची कुठेही चिटिंग होणार नाही वा आपल्याला पोलीसही पकडणार नाही, असा विश्वास दिला
कारण या व्यवसायात केवळ हायप्रोफाईल नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. तुम्ही जर हायप्रोफाईल (गर्भश्रीमंत) महिलेकडे सेवा देण्यासाठी गेले असता तुमचा सर्व खर्च आणि सुरक्षिततेची जबाबदारी ती घेते. सेवा देणारा किंवा सेवा घेणारा हे दोन्ही कंपनीच्या आयव्हीआर सिस्टीमने दिलेल्या कोडचे पालन करीत असतात. त्यामुळे या व्यवसायात कोणताही रिस्क फॅक्टर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस आणि सरकारचा अशा कंपन्यावर कोणताही वचक नसल्याने या कंपन्याचे धाडस वाढले , हे मात्र नक्की.
या अकाऊंटवर होतात व्यवहार
‘टेक्नो इमर्ज’ कंपनीच्या जोधपूर पार्क, कोलकाता येथील स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) खाते क्रमांक ३६५७६५६७६०३ आणि आयएफएससी कोड क्रमांक एसबीइन ००११५३९ यावर चालतात.
लोकमतची भूमिका
गोड बोलून शेकडो तरुण-तरुणींना हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकविणाºया अशा लोकांना समाजाने धडा शिकविणे आवश्यक आहे. पोलीस आणि प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी या कंपन्या सातत्याने बदलवित असलेली नावे आणि कार्यालयांची स्थळे यामुळे पोलिसांच्या हाती लागत नाही. मात्र या कंपन्यांच्या कार्यपद्धती समजून त्यांना पकडणे हे आता पोलिसांच्या सायबर विभागापुढे आव्हान आहे. मितालीच्या जाळ्यात अडकलेल्या नागपुरातील एका निवृत्त अभियंत्याने हा व्यवसाय उजेडात आणला. मात्र जे तरुण-तरुणी या व्यवसायात अडकले आहेत किंवा ज्या सूज्ञ पालकांना याची कुणकुण लागली आहे त्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे आहेत कॉल सेंटरचे नंबर
नागपुरात ज्या स्त्री आणि पुरुषांना ‘टेक्नो इमर्ज’ या कंपनीच्या कॉल सेंटरवरून कॉल येतात ते मोबाईल क्रमांक ९०७३९१५६२४, ९०७३९१५६२०, ९०७३९१५६२७ असे आहेत. यावरून प्रामुख्याने बिशा, नीलम आणि स्विटी नावाच्या तरुणी संवाद साधतात. मात्र यातील एक नंबर रविवारी बंद होता.
 

Web Title: Kolkata connections for high-profile dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.