ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे देशाचा विकास शक्य
By Admin | Updated: July 6, 2014 00:47 IST2014-07-06T00:47:49+5:302014-07-06T00:47:49+5:30
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर झाल्यास ग्रामीण भारताचा विकास सहज शक्य आहे. देशातील गरिबीही दूर करण्याचे हे आधुनिक तंत्र आहे. आजच्या युवा पिढीने याचा योग्य वापर करुन

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे देशाचा विकास शक्य
गुणवंतांचा गौरव : द.मे. आयुर्विज्ञान विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ
वर्धा : ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर झाल्यास ग्रामीण भारताचा विकास सहज शक्य आहे. देशातील गरिबीही दूर करण्याचे हे आधुनिक तंत्र आहे. आजच्या युवा पिढीने याचा योग्य वापर करुन देण्याच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी सावंगी(मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात थाटात पार पडला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, व्यवस्थापन मंडळाचे संचालक सागर मेघे, मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरु डॉ. दिलीप गोडे यांच्यासह विविध शाखेचे अधिष्ठाता व प्राचार्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
देशात गरिबी, भुखमरी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. जगात कोणतीही गोष्ट असाध्य नाही. यासाठी देशातील तरुणाईने पुढाकार घेण्याची गरज आहे. तरुणाईने आधुनिक टेक्नॉलाजीचा पुरेपूर वापर केल्यास देशाला प्रगतीची वाट दाखविणे शक्य आहे. बेरोजगारी आहे म्हणून आपणही रोजगार मागणाऱ्यांच्या रांगेत लागू नये, तर रोजगार देणारे व्हा, शालांत परिक्षेत गुणवत्ता प्राप्त करतो तो ज्ञानी होतो. जो जीवनाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करतो. तो खऱ्या अर्थाने नागरिक असतो, असे मौलिक विचारही ना. गडकरी यांनी यावेळी मांडले.(जिल्हा प्रतिनिधी)