दारूच्या गुत्त्यावर चालला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST2021-08-01T04:07:23+5:302021-08-01T04:07:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दारू पिताना विनाकारण बरळत असलेल्यावर दारूच्या दुकानातील नोकराने चाकूहल्ला करून त्याला जबर जखमी केले. ...

The knife ran over the liquor store | दारूच्या गुत्त्यावर चालला चाकू

दारूच्या गुत्त्यावर चालला चाकू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दारू पिताना विनाकारण बरळत असलेल्यावर दारूच्या दुकानातील नोकराने चाकूहल्ला करून त्याला जबर जखमी केले. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

महेंद्र बंडूजी जिंदे (५०) असे जखमीचे नाव आहे. ते विश्वकर्मानगरात राहतात. राजकमल चाैकातील जयस्वाल यांच्या देशी दारूच्या दुकानात जिंदे दारू प्यायला गेले. दारू पिताना ते विनाकारण बरळू लागले. त्यामुळे दुकानात काम करणारा विनोद ऊर्फ भाचा याने जिंदेला गप्प राहण्यास सांगितले. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर आरोपी विनोदने जिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर चाकूने हल्ला चढवला. दुकानातील दुसऱ्या मद्यपींनी त्याच्या तावडीतून जिंदेंना सोडवले. जखमी जिंदेंना रुग्णालयात नेण्यात आले. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे अजनी पोलिसांनी आरोपी विनोदविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: The knife ran over the liquor store