डायनॅमिक नेव्हिगेशनद्वारे गुडघ्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:59+5:302021-04-07T04:09:59+5:30
गुडघे प्रत्यारोपणासंबंधी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात नेहमीच संशय असतो. सुरक्षित आणि खात्रीशीर पद्धतीने शस्त्रक्रियेसाठी दक्षिण पूर्व आशियातील पहिले ...

डायनॅमिक नेव्हिगेशनद्वारे गुडघ्याचे
गुडघे प्रत्यारोपणासंबंधी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात नेहमीच संशय असतो. सुरक्षित आणि खात्रीशीर पद्धतीने शस्त्रक्रियेसाठी दक्षिण पूर्व आशियातील पहिले यंत्र ‘किक-थ्री’ आता रुग्णांना नागपुरात उपलब्ध आहे.
सामान्य शस्त्रक्रियेत होणारी गुडघ्याची अस्थिरता आदी समस्यांपासून बचावासाठी या नवीन यंत्राद्वारे सर्जरी करण्यापूर्वीच रुग्णाच्या शरीररचनेनुसार त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती पूर्वीच डॉक्टरांना मिळणार आहे. याद्वारे कमी वेळात आणि वेदनारहित शस्त्रक्रिया शक्य असल्याचे डॉ. आदित्य बोथ्रा यांनी सांगितले.
एमएसडीएनबी ऑर्थो सर्जन डॉ. बोथ्रा म्हणाले, पारंपरिक पद्धतीच्या तुलनेने नवीन उपचारपद्धतीमुळे गुडघ्यांच्या दुखण्याने त्रासलेल्यांना वरदानच लाभले आहे. अस्थिसुषिरता, गुडघ्यांचे विकार, अपघातामुळे गुडघ्यांचे स्नायूबंध किंवा गुडघ्याची हानी झाल्यामुळे पायांच्या हालचालींवर मर्यादा येतात. सांधा बदलण्यासाठी गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. या शस्त्रक्रियेत सदोष सांधा कृत्रिम सांध्यांनी बदलविण्यात येतो. या शस्त्रक्रियेत एकमेकांना घासणाऱ्या हाडांवर विशिाष्ट धातूचे इम्प्लॉन्ट बसवण्यात येतात.
क्लिअर लेन्स टेक्नॉलॉजीमुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढते, शारीरिक रचनेनुसार शस्त्रक्रियेची पद्धत आणि शस्त्रक्रियेपूर्वीच पूर्ण अचूक प्लॅनिंग शक्य होते व त्याची अंमलबजावणीची गरज असते
उपलब्ध शस्त्रक्रिया :
- जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, लिगामेंट सर्जरी, स्पाईन सर्जरी, कुल्ह्याचे फॅक्चर.
रुग्णांना फायदे :
- या नव्या पद्धतीमुळे इम्प्लाँटचे वयमान वाढते
- लिगामेंट अस्थिर होऊन लचक राहत नाही
- बॅलन्सिंगमध्येही मदत मिळते
- रुग्णाची रिकव्हरी लवकर होते
देशातील पहिली नेव्हिगेशन उपचार पद्धत :
डॉ. आदित्य बोथ्रा यांना देशात पहिल्यांदा नेव्हिगेशन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणणाऱ्या जगप्रसिद्ध असलेल्या मुंबई येथील डॉ. सी.जे. ठक्कर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. याशिवाय डॉ. बोथ्रा यांनी नेव्हिगेशनचे प्रशिक्षण युके येथील नॅशनल रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये घेतले आहे.
सामान्य शस्त्रक्रियेच्या दरात उपचार :
या नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या शस्त्रक्रियेचे दर सामान्य शस्त्रक्रियेपेक्षा २० ते ३५ टक्के अधिक असतात. विदर्भातील नागरिकांना याचा लाभ व्हावा म्हणून डॉ. बोथरा यांच्यासह डॉ. निखिल मालेवार, डॉ. संजय पारेख यांनी सामान्य शस्त्रक्रियेच्या दरातच सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्याचा निर्धार केला आहे.