हिंगणा येथे पतंग महाेत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:21+5:302021-01-16T04:11:21+5:30
हिंगणा : शहरातील कसबा भागात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्यावतीने मकरसंक्रांतीनिमित्त गुरुवारी (दि. १४) पतंग महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ...

हिंगणा येथे पतंग महाेत्सव
हिंगणा : शहरातील कसबा भागात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्यावतीने मकरसंक्रांतीनिमित्त गुरुवारी (दि. १४) पतंग महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी महिलांचा गाैरव करण्यात आला. शिवाय, १५० मुलांना पतंग भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सभापती उज्ज्वला बाेढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष आशिष पुंड, माजी सभापती भावना पुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, महिला अध्यक्ष सुरेखा जिचकार पांडुरंग धोटे, रामदास बन्सोड, रवींद्र भाकरे उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते मंजुळा धोटे, वनिता जोशी, सुंनदा धोटे, कुंदा जिचकार ,विमल जिचकार, लता खापरे, उषा बन्सोड, विमल राखुंडे, शांता भाकरे यांचा गाैरव करण्यात आला. यशस्वितेसाठी सुरेश उरकुंडे, प्रशांत चव्हाण, मीनाक्षी धोटे, सारिका सार्वे, सुनीता भाकरे, आरती धोटे, रिना धोटे, वनिता पुंड, अर्चना बन्सोड, जयश्री चव्हाण, आशिष भाकरे, अक्षय अडेकर, संकेत भाकरे यांनी सहकार्य केले. संचालन कार्यक्रमाचे आयोजक आशिष पुंड यांनी केले तर सुनंदा धोटे यांनी आभार मानले.