राजा गौसचा साथीदार अडकला

By Admin | Updated: April 20, 2015 02:06 IST2015-04-20T02:06:29+5:302015-04-20T02:06:29+5:30

जेल ब्रेक प्रकरण : गुन्हेशाखेच्या ताब्यात

King Gaus's companion is strangled | राजा गौसचा साथीदार अडकला

राजा गौसचा साथीदार अडकला

नागपूर : जेल ब्रेकच्या कटाची माहिती असलेला आणि मध्यप्रदेशातील गुन्हेगारांच्या संपर्कात असलेल्या एका आरोपीला गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सुरज जंगल्या नामक आरोपी कुख्यात राजा गौसचा मित्र कम साथीदार आहे. सूरजचा मोठा भाऊ कुख्यात राजाचा नंबरकारी होता. तो मृत झाल्यानंतर झाल्यानंतर राजा कारागृहातूनच सूरजसोबत फोनलाईनवर संपर्कात होता.
लखनदौन (मध्यप्रदेश) कारागृहातून पळून जाताना राजाला तेथील सप्पा नामक कुख्यात गुंडाची साथ मिळाली होती. या सप्पाच्याही सूरज संपर्कात होता. राजा-सूरज-सप्पा असे हे निरंतर फोनोफ्रेण्ड होते. राजा कारागृहातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूरजला होती. त्यासाठी सूरज जुळवाजुळवही करीत होता. मात्र, राजाला सोडून त्याचे पाच खतरनाक साथीदार पळून गेले. तेव्हापासून राजाने पोलिसांच्या धाकामुळे आपली फोनलाईन जाम केली. दरम्यान, राजाच्या फोन कॉल्सचे डिटेल्स काढल्यानंतर सूरजचे नाव अधोरेखित झाले. त्यावरून गुन्हेशाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले.(प्रतिनिधी)

Web Title: King Gaus's companion is strangled