काेराेनाने पालक हिरावलेल्या मुलांना बालगृहाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:39+5:302021-05-24T04:07:39+5:30
काेदामेंढी येथील रहिवासी अरुण माेहनकर माेलमजुरी करून कुटुंबाचे संगाेपन करीत हाेते. अशा अभावग्रस्त परिस्थितीतही १८ वर्षांचा माेठा मुलगा प्रणय ...

काेराेनाने पालक हिरावलेल्या मुलांना बालगृहाचा आधार
काेदामेंढी येथील रहिवासी अरुण माेहनकर माेलमजुरी करून कुटुंबाचे संगाेपन करीत हाेते. अशा अभावग्रस्त परिस्थितीतही १८ वर्षांचा माेठा मुलगा प्रणय बारावीत प्रथम श्रेणीत पास झाला. मजवी मुलगी आंचल दहाव्या वर्गात आहे, तर लहान काजल सहाव्या वर्गात. परिस्थिती हालाखीची असली तरी बापाचा आधार हाेता. मात्र काेराेनाच्या भयावह दुसऱ्या लाटेने बाप नावाचा एकमेव आधारही हिरावला गेला. एप्रिलमध्ये काेराेना संसर्गाने त्यांचे निधन झाले. दीड महिना झाल्यानंतर स्वत:ला सावरत प्रणय बहिणींच्या पाेटासाठी काम मिळावे म्हणून बाहेर पडला. मात्र त्याला काम देणार तरी काेण? माेठी आई घरी गेली तेव्हा घरात चूलही पेटली नसल्याचे दिसले. धान्याचे डबे रिकामे हाेते. काही तरुणांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्यानंतर बालकल्याण समितीची टीम काेदामेंढीला पाेहोचली. त्यांनी तिन्ही मुलांना नागपूरला आणले. दाेन्ही बहिणींना खसाळामसाळा येथील आशाकिरण गृहात ठेवले, तर मुलाला शासकीय मुलांच्या अनुरक्षण गृहात ठेवले. ताटातूट झाली असली तरी या अनाथ झालेल्या भावंडांना आधार मिळाला.
पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पाच मुले
काेराेनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या पाच बालकांना बालगृहाचा आधार मिळाला हाेता. नुकतेच नागपुरातील दाेन भावंडांबाबतही असेच घडले हाेते. त्यांना बालगृहात आणण्यातही आले. मात्र शहरातच असलेले मुलांचे आजाेबा पालकत्व स्वीकारण्यास तयार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सुपुर्द करण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात यांनी दिली.
शासनाचे टास्क फाेर्स
राजीव थाेरात यांनी माहिती देताना सांगितले, अशा अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य शासनाने टास्क फाेर्स तयार केली आहे. त्यांची काळजी व संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा मुलांसाठी केंद्र सरकारतर्फे ३० हजार तर राज्य शासनातर्फे २० हजार रुपये मुलांच्या खात्यात जमा केले जाते. नागरिकांनी अशा मुलांची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत असून, त्यासाठी प्रशासनातर्फे रुग्णालयाबाहेर पाेस्टर लावून जागृती करण्यात येत असल्याचे थाेरात यांनी सांगितले.
शासनाने धाेरण ठरविण्याची गरज
काेराेनाच्या महामारीने पालक हिरावल्यामुळे राज्यात शेकडाे मुले पाेरकी झाली आहेत. अशा मुलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनाची व शिक्षणाची जबाबदारी शासनाने उचलावी. यासाठी ठाेस धाेरण ठरविणे गरजेचे आहे.
- दीनानाथ वाघमारे, संघटक, संघर्ष वाहिनी,