आधी हत्या, नंतर आत्महत्या

By Admin | Updated: October 24, 2016 02:56 IST2016-10-24T02:56:05+5:302016-10-24T02:56:05+5:30

तरुण व तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगसा गुरुवारी

Before killing, then suicide | आधी हत्या, नंतर आत्महत्या

आधी हत्या, नंतर आत्महत्या

गुन्हा दाखल : तरुण-तरुणी आत्महत्या प्रकरण
केळवद : तरुण व तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगसा गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, तरुणाने सुरुवातीला तरुणीची हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली, असे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी मृत तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.

विनोद मधुकर गजभिये (२६, रा. मंगसा, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे व मोना दत्तू बोरीकर (२२, रा. केळवद, ता. सावनेर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मोना ही गुरुवारी मंगसा येथे विनोदच्या घरी आली होती. सायंकाळी विनोदच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेने विनोदला आवाज दिला. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्या महिलेने परिसरातील नागरिकांना बोलावले. नागरिकांनी आतून बंद असलेले दार तोडले. तेव्हा त्यांना मोना ही पलंगावर पडली असल्याचे तसेच तिच्या गळ्याला ओढणी गुंडाळलेली असल्याचे तसेच विनोद हा छताच्या पंख्याच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले.
माहिती मिळताच केळवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी मोनाचा मृतदेह नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मोनाचा मृत्यू ओढणीने गळा आवळल्याने झाल्याचे प्राथमिक उत्तरीय तपासणी अहवालात आढळून आले. त्यामुळे विनोदने आधी मोनाचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, असेही निदर्शनास आले. परिणामी, केळवद पोलिसांनी मृत विनोद गजभिये याच्याविरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.
या घटनेचा तपास सावनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर व ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर भरणे करीत आहेत. (वार्ताहर)

दोन वर्षांपासून मैत्री
मोना ही आयटीआय उत्तीर्ण होती. शिवाय, तिचे लग्न जुळले होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये विवाह मुहूर्त शोधून समारंभ पार पाडण्याचा तिच्या घरच्या मंडळींचा मानस होता. मोना आणि विनोदची मागील दोन वर्षांपूर्वी ओळख झाली आणि तेव्हापासूनच त्यांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. याच मैत्रीपूर्ण संबंधामुळे ते दोघेही एकमेकांना नेहमीच भेटत असत. याच मैत्रीत तिचा घात झाला.

Web Title: Before killing, then suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.