शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

किडनी ट्रान्सप्लांट सेंटरला मंजुरी

By admin | Updated: January 6, 2016 03:54 IST

अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) किडनी ट्रान्सप्लांट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) ..

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : सार्वजनिक आरोग्य विभागाचे मिळाले प्रमाणपत्रनागपूर : अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) किडनी ट्रान्सप्लांट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसल्याचे कारण पुढे करीत सार्वजनिक आरोग्य विभागाने या केंद्राला परवानगीसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र थांबवून ठेवले होते. ‘लोकमत’ने याचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर अखेर मंगळवारी हे प्रमाणपत्र देण्यात आले. यामुळे येत्या आठ दिवसांत राज्यातील शासकीय रुग्णालयात पहिले किडनी प्रत्यारोपण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील हजाराहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात प्रथमच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याची घोषणा २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. तीन महिन्यात हे केंद्र सुरू करा, असे निर्देशही मेडिकल प्रशासनाला दिले होते. परंतु घोषणेच्या सात महिन्यानंतर ४ जुलै २०१५ रोजी झालेल्या अभ्यागत मंडळात हा विषय समोर आला. अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राला घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाला धारेवर धरले होते. ‘मुहूर्त शोधत आहात का’, असा थेट सवाल करीत तीन दिवसांत प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. परंतु आरोग्य विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसल्याचे कारण पुढे करीत प्रमाणपत्र राखून ठेवले. याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी घेतली. काही दिवसांतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक दस्तऐवज सादर केले. परंतु तब्बल तीन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मंडळाने मंजुरी दिल्याचे मिनिटस् मेडिकलला प्राप्त झाले. सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने हे मिनिटस् आणि प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्याचे पत्र आरोग्य विभागाला पाठविले. परंतु मिनिट्स नको प्रमाणपत्र हवे, असा हट्ट आरोग्य विभागाने धरल्याने किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले शेकडो रुग्ण अडचणीत आले होते.(प्रतिनिधी)