शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नागपुरात खंडणीसाठी अपहरण : महिलेने जाळ्यात ओढून निर्जन ठिकाणी नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:54 IST

मदतीच्या नावाखाली एका व्यक्तीला जवळ बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि नंतर त्याला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीमध्ये तीन महिला आरोपींचा समावेश आहे.

ठळक मुद्देसाथीदारांच्या मदतीने कृत्य : पाचपावलीतील घटना, टोळी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मदतीच्या नावाखाली एका व्यक्तीला जवळ बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि नंतर त्याला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीमध्ये तीन महिला आरोपींचा समावेश असून सोमू दीपक चक्रधर (वय २९, रा. बाळाभाऊपेठ), रसिका राजीव घाटे (वय २१, रा. लष्करीबाग), रंजना विलास पराते (वय २४, रा. नाईक तलाव बांगलादेश), संग्राम ऊर्फ राजा आलोक पाठक (वय २२, रा. मेहंदीबाग), गौरव सूर्यकांत ढवळे (वय ३०, रा. दहीबाजार, इतवारी) आणि गणेश दशरथ निनावे (वय २५, रा. बिनाकी मंगळवारी) अशी आरोपींची नावे आहेत.कळमन्यातील विजयनगरात संजय चंदू शाहू (वय २६) राहतो. तो सेंट्रींगचा कंत्राटदार आहे. त्याला २२ जुलैला सायंकाळी ५.३० च्या सुमारास रंजना परातेने फोन केला. आपण विधवा असून, मला मदतीची गरज आहे, असे सांगून तिने संजयला कमाल चौकात भेटायला बोलविले. संजय तेथे पोहचला. रंजनाने त्याला आपल्या जाळ्यात अडकविले. चहा घेतल्यानंतर त्याला सीताबर्डीत सोडून देण्याची विनंती केली. दुचाकीने बर्डीत आल्यानंतर अंबाझरीकडे फिरायला जाऊ म्हणत त्याला तिकडे नेले. तेथून वडधामणा आणि नंतर चोखरदानीकडे नेले. एव्हाना रात्रीची वेळ झाली होती. रंजना स्वत:हूनच त्याला निर्जन ठिकाणी फिरायला चलण्यास बाध्य करीत असल्याने संजयही मनोमन मोहरला होता. दरम्यान आईचा फोन आला असे सांगून तिने संजयला दुचाकी थांबवण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांच्याजवळ एक तवेरा आली आणि त्यातून उतरलेल्या आरोपींनी संजयला जबरदस्तीने आपल्या वाहनात कोंबले. त्याला बेदम मारहाण केली. आमच्या नात्यातील महिलेला एवढ्या रात्री कलुषित इराद्याने इकडे घेऊन आला, असा आरोप लावत त्यांनी संजयला बदनामीचा धाक दाखवत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. आपण आरोपींच्या कटकारस्थानात अडकल्याचे लक्षात आल्याने संजयने मित्राकडून रक्कम मागवतो, असे सांगत आरोपींना अग्रसेन चौकाजवळ घेऊन चलण्यास सांगितले. त्यानुसार, आरोपी संजयला घेऊन मध्यरात्री अग्रेसन चौकात आले.मित्र आणि पोलिसांचे प्रसंगावधानसंजयचे अपहरण झाले आणि त्याच्या जीवाला धोका आहे, हे फोनवरून लक्षात आल्यामुळे संजयच्या मित्राने लगेच पाचपावली पोलिसांना माहिती कळविली. अपहरण करून एक लाखाची खंडणी मागितली गेल्याची माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर आणि ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे पोलीस उपनिरीक्षक गोडबोले, उपनिरीक्षक रामटेके तसेच कर्मचारी विजय यादव, राजेश देशमुख, अनिरुद्ध मेश्राम, चिंतामण डाखोरे, सुरेखा, महेश जाधव, विनोद गायकवाड, रवी मिश्रा, विजय जाने आणि शिपाई सुमित यांनी सापळा रचला.पोलीस बनले मेट्रोचे कर्मचारीपोलीस आल्याचे पाहून आरोपी पळून जाऊ शकतात, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी डागा हॉस्पिटलजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरील कर्मचाऱ्यांना मेट्रोचे जॅकेट आणि हेल्मेट मागितले. ते घालून पोलिसांनी आरोपींच्या वाहनाला गराडा घातला आणि त्यांना पकडून संजयची सुटका केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणArrestअटक