शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बॉबी माकणला अपहरण - हत्याकांड : अनेकांनी मिळून केला गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:01 IST

उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडात पोलिसांनी अद्याप कायदेशीर कुणालाही अटक केलेली नाही. मात्र, या हत्याकांडाचा उलगडा करण्यास मदत करेल, असे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्या कारमधून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कारही पोलिसांनी शोधली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात या अपहरण आणि हत्याकांडाचा खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

ठळक मुद्देबडे मासे संशयाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडात पोलिसांनी अद्याप कायदेशीर कुणालाही अटक केलेली नाही. मात्र, या हत्याकांडाचा उलगडा करण्यास मदत करेल, असे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्या कारमधून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कारही पोलिसांनी शोधली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात या अपहरण आणि हत्याकांडाचा खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.गुरुवारी २५ मे च्या मध्यरात्री अज्ञात आरोपींनी बॉबी माकण यांचे अपहरण केले. दुसऱ्या दिवशी त्यांची कार बेवारस अवस्थेत घरापासून काही अंतरावर आढळली. पोलिसांनी २६ मेच्या दुपारी बॉबीच्या पत्नीच्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद घेतली. तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडला. बॉबीचा चेहरा पुरता विद्रूप झाला होता. त्यामुळे हत्येनंतर त्यांच्या चेहºयावर आरोपींनी अ‍ॅसिड टाकल्याचा संशय आहे. दरम्यान, अपहृत बॉबीची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जरीपटका, पाचपावली आणि गुन्हे शाखेची सुमारे १० पथके शोधाशोध करीत आहेत.अपहरणाला पूर्ण सात दिवस तर हत्या झाल्याचे उघड होऊन पाच दिवस झाले आहे. या पाच दिवसांत पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून पवन मोर्यानी, लिटिल सरदार, मंजित वाडे याच्यासह डझनभर आरोपींची चौकशी केली. दुसरीकडे लिटिलचा साथीदार सिटू यालाही पंजाबमध्ये जाऊन ताब्यात घेतले. त्याच्यासोबत पोलिसांनी मिकी नामक गुन्हेगाराचीही चौकशी केली. या चौकशीतून एक एक धागा जुळवित पोलिसांना एक ठोस पुरावा हाती लागला आहे. तो म्हणजे, ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कार कुणाची होती, ती कुणाकडे होती आणि कुणी तिला अपहरणासाठी नेले, ती नावे पोलिसांना मिळाली आहे. त्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री एका गॅरेजमधून ही पांढरी इनोव्हा कार जप्त केली. गुन्ह्यानंतर पुरावे मिटविण्यासाठी ती गॅरेजमध्ये पाठविण्यात आल्याचा संशय आहे.आरोपींनी गुन्ह्यानंतर त्या कारची मागची बाजू बदलवली असून, आतमधीलही इंटेरिअरसोबतही छेडछाड केल्याचे समजते. या गुन्ह्यात सर्वात महत्त्वाची कडी असलेला आरोपी मुंबईकडे पळून गेल्याची माहिती असून, पोलीस त्यालाही शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकूणच या खळबळजनक प्रकरणाच्या अनेक कड्या पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्या जुळवून गुन्ह्याची साखळी तयार करण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहे. त्यानुसार अनेकांनी मिळून कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारातून बॉबीचा गेम केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होण्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत.संशयित म्हणतो, मुझे अंदर डाल दो ...!पोलीस या गुन्ह्यांतील आरोपींच्या जवळ पोहचल्याचे संकेत मिळाल्याने गुन्हेगारांची धावपळ तीव्र झाली आहे. या गुन्ह्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता निर्माण झाल्याने एक चक्रावणारी घडामोड पुढे आली. एका मुख्य संशयिताने पोलिसांना ‘मुझे अंदर डाल दो’ बाकीयोंको तकलिफ मत दो, असे म्हटल्याचे समजते. या संशयिताकडे अनेक व्याधींची प्रमाणपत्रे असल्याचे समजते. त्यामुळे पोलीस सावधगिरीने त्याच्या या भूमिकेचाही तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर