घटस्फोटित पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST2020-12-31T04:09:47+5:302020-12-31T04:09:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घटस्फोटित पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात साहिल सैयदला गुन्हे शाखेने अटक केली ...

Kidnapping and beating his divorced wife | घटस्फोटित पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण

घटस्फोटित पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घटस्फोटित पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात साहिल सैयदला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस आयुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी दखल घेतली, तेव्हा कुठे चार महिन्याने याप्रकरणी कारवाई झाली, हे विशेष ! त्याला तीन दिवसाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

जुलै महिन्यात ॲलेक्सिस हाॅस्पिटल प्रकरण पुढे आल्यावर साहिल चर्चेत आला होता. त्याने मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, आपली पत्नी नीलिमा, भाऊ आणि सहकाऱ्यांच्या मदतीने ॲलेक्सिस हाॅस्पिटलमधील बांधकामाची तोडफोड करून धमकावले होते. हा तपास तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्याच्याविरोधात धोकेबाजी, जमीन हडपणे, मारहाण करणे आदी गुन्हे दाखल होते. याचदरम्यान पीडित युवतीही न्यायासाठी पुढे आली. साहिलने फसवून तिच्याशी लग्न केले, नंतर शारीरिक शोषण करून घटस्फोट दिला होता. तिचे अपहरण करून तो सुरेंद्रनगरातील कब्जा केलेल्या घरी घेऊन गेला होता. तिथे नीलिमा जायसवाल, भाऊ आणि साथीदारांच्या मदतीने पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली होती. काही आक्षेपार्ह गोष्टी कबूल करण्यासाठी मारहाण करून त्याची व्हिडीओ क्लिपिंग तयार केली होती. पीडितेच्या नावाने असलेला फ्लॅटदेखील साहिलने आपल्या नावावर केला होता.

या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी साहिलविरुद्ध गुन्हा दाखल करूनही तत्कालीन ठाणेदारांनी कारवाईत बरीच चालढकल केली. तो अन्य प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक करण्याचे टाळले. यामुळे पीडितेने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्याची मागणी अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. ती मान्य होताच मंगळवारी रात्री साहिलला अटक करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असलेल्यांवरील कारवाईसंदर्भात माहिती मिळू शकली नाही.

...

गंटावारवर कारवाई नाही

डॉ. प्रवीण गंटावारच्या विरोधात गुन्हे शाखेकडे आणि एसीबीकडे प्रकरण दाखल आहे, तरीही अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. यामुळे चर्चेला बरेच उधाण आले आहे. ते अद्यापही मनपात आपल्या पदावर आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी तातडीने कारवाईचे संकेत रविवारी दिले. त्यावर आता काय कृती केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागृून आहे.

...

Web Title: Kidnapping and beating his divorced wife