शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

छत्तीसगडमधील अपहृत सपना पोहचणार कुटुंबियांत

By नरेश डोंगरे | Updated: February 24, 2024 22:56 IST

बलरामपूर जिल्ह्यातून झाले होते अपहरण : आरपीएफने घेतले ताब्यात

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : छत्तीसगडमधून अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयिन मुलीचा छडा लावण्यात नागपूर आरपीएफने यश मिळवले. शुक्रवारी रात्री येथील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. सपना (नाव काल्पनिक, वय १७) छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी असून आज सायंकाळी पोलिस तिला घेऊन बलरामपूरकडे रवाना झाले.

बलरामपूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले असून तिचे लोकेशन नागपूरकडे दिसत असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांकडून शुक्रवारी सायंकाळी ६.४० वाजता रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) मिळाली होती. त्यानुसार, येथील रेल्वे स्थानकावर जीआरपी तसेच आरपीएफचे जवान संबंधित मुलीचा शोध घेत होते. पोलिसांनी कळविलेल्या वर्णनाची मुलगी फलाट क्रमांक ८ वर सहायक उपनिरीक्षक जुम्मा इंगळे, डी. एस. सिसोदिया यांच्या नजरेस पडली. त्यांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस उपनिरीक्षक प्रियंका सिंग यांच्यासमोर हजर केले.

आरपीएफचे पोलीस निरीक्षक आर. एल. मिना यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घटनेच्या काही तासांपूर्वी तिघांनी तिचे अपहरण केल्याची माहिती दिली. ती आपल्या आजोबासोबत दुपारी बाजारात गेली होती. आजोबा दुसरीकडे आणि ती दुसरीकडे खरेदी करीत असताना तीन तरुणांनी तिला नशिला पदार्थ खाऊ घातला. त्यानंतर लाल रंगाच्या कारमध्ये बसवून नरसिंगपूरपर्यंत नेले. तेथून तिला रेल्वेत बसवून नागपूरकडे घेऊन आले. दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर आरोपींना गुंगारा देऊन आपण रेल्वे स्थानकावर उतरल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अपहरणाच्या गुन्ह्यातील पीडित त्यात अल्पवयीन असल्याने आरपीएफने लगेच ही माहिती छत्तीसगड, बलरामपूर पोलिसांना कळवून सपनाला शुक्रवारी रात्री चाईल्ड लाईनच्या हवाली केले.नातेवाईकांनी घेतले ताब्यात

दरम्यान, आज दुपारी बलरामपूर पोलीस सपनाच्या नातेवाईकांसह नागपुरात पोहचले. त्यांनी प्राथमिक विचारपूस केल्यानंतर कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करून सपनाला आपल्या ताब्यात घेतले. हे पथक आज सायंकाळी बलरामपूरकडे रवाना झाले. सपनाच्या कथनाचे वास्तव तपासून पुढील कारवाई बलरामपूर पोलीस करणार असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिस