अपहृत लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचा खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:06 IST2017-11-22T19:00:56+5:302017-11-22T19:06:07+5:30

एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या लॉटरी व्यापाऱ्याचा मुलगा राहुल आग्रेकार (३४) याचा मृतदेह बुटीबोरी येथे आढळला आहे.

Kidnapped lottery businessman's son murdered? | अपहृत लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचा खून?

अपहृत लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचा खून?

ठळक मुद्देनागपूरजवळील बुटीबोरीत आढळला मृतदेह१ कोटी रुपयासाठी करण्यात आलेले होते अपहरण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या लॉटरी व्यापाऱ्याचा मुलगा राहुल आग्रेकार (३४) याचा मृतदेह बुटीबोरी येथे आढळला आहे. आग्रेकर यांच्या दोन मित्रांवर पोलीसांना संशय आहे, जे कालपासून बेपत्ता  आहेत.
राहुल आग्रेकर मंगळवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास दारोडकर चौक परिसरातील त्यांच्या घरातून निघाले. एक ते दीड तासात परत येतो, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. मात्र, ते दुपारपर्यंत परतले नाही. दुपारी राहुल यांच्याच फोनवरून आग्रेकर कुटुंबीयांना राहुलचे अपहरण केले आहे, त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी द्या, अशी मागणी करणारा फोन आला.
आग्रेकर कुटुंबीय घाबरले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र, संध्याकाळी त्यांनी लकडगंज पोलिस स्टेशन गाठून राहुल बेपत्ता असून खंडणीसाठी फोन आल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हापासून पोलिसांच्या अनेक पथकांनी राहुल आग्रेकर यांच्या शोधासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्याचा मृतदेह बुटीबोरी येथे आढळला आहे.
दरम्यान मृतदेह त्यांच्या मुलाचा असल्याचे कुटुंबियांनी नाकारले.

Web Title: Kidnapped lottery businessman's son murdered?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण