शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नागपुरातील  अपहृत चिमुकली सहा तासानंतर सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:05 IST

लकडगंज परिसरात घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले. या घटनेने पोलीस विभाग हादरून गेला. लकडगंज पोलिसांचे दोन पथक आणि गुन्हे शाखेचे पाच पथक तयार करून चिमुकलीचा शोध सुरु झाला. अखेर या प्रयत्नांना यश आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास चिमुकली मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये सापडली.

ठळक मुद्देसोशल मीडियाच्या माध्यमातूनच चिमुकलीचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लकडगंज परिसरात घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले. या घटनेने पोलीस विभाग हादरून गेला. लकडगंज पोलिसांचे दोन पथक आणि गुन्हे शाखेचे पाच पथक तयार करून चिमुकलीचा शोध सुरु झाला. अखेर या प्रयत्नांना यश आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास चिमुकली मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये सापडली.श्रद्धा अरुण सारवणे (४) रा. लाकडीपूल, हत्तीनाला असे चिमुकलीचे नाव आहे. अरुण सारवणे (२६) हे मनपाच्या महाल झोन कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. पत्नी गृहिणी असून मोठी मुलगी श्रद्धा व लहान मुलगा आहे. त्यांच्या शेजारीच लहान भाऊ राहतो. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता श्रद्धा व चुलत भाऊ यश (६) हे दोघेही घरासमोरील रस्त्यावर खेळत होते. दरम्यान २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक तरुण दुचाकीने तेथे आला. त्याने कबुतर दाखवण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसण्यास सांगितले. श्रद्धा आरोपीच्या दुचाकीवर बसली तर यश घरी निघून गेला. यशने घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या आईला घटना सांगितली. तिने लगबगीने पतीला फोन केला आणि स्वत:ही परिसरात श्रद्धाला शोधायला लागली. नातेवाईकांनाही माहिती दिली. त्यामुळे तेसुद्धा शोध घेत होते. दोन तासापर्यंत शोधाशोध केल्यानंतर अरुणने लकडगंज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक यांनी लगेच पथके तयार करून शोधशोध सुरू केली. तसेच गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली. त्यांची पथकेही चिमुकलीला शोधू लागले. गुन्हे शाखा युनिट तीनचे प्रमुख ज्ञानेश्वर भेदोडकर आणि त्यांचे पथक आरोपीचा शोध घेत असतानाच ती चिमुकली मेडिकलमधील वॉर्ड क्र.३४ मध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पथकासह लगेच मेडिकल गाठले. त्यांनी मुलीला ताब्यात घेतले. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या चिमुकलीची पोलिसांनी आस्थेने विचारपूस केली.शेवटी श्रद्धाला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.सोशल मीडियाचा आधारश्रद्धाचे अपहरण झाल्याची खबर वाऱ्यासारखी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरवर त्या मुलीचे फोटो आणि पत्ता आणि अन्य माहिती फिरत होती. तसेच पोलिसांच्या अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये मुलींचे फोटो व्हायरल झाले होते. शहरभर शोधाशोध सुरू असताना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच चिमुकलीचा शोध लागल्याची माहिती आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर