खैरलांजीतून टिकास, फावडे जप्त

By Admin | Updated: May 25, 2014 00:56 IST2014-05-25T00:56:37+5:302014-05-25T00:56:37+5:30

देव्हाडी येथील काशीराम कुकडे याचा खून करण्यासाठी उपयोगात आणलेली टिकास आणि फावडे तुमसर पोलिसांनी शनिवारी सकाळी काशीरामचा मेहुणा संजय पंचबुद्धे याच्या

Khiranganji decisis, shovel seized | खैरलांजीतून टिकास, फावडे जप्त

खैरलांजीतून टिकास, फावडे जप्त

प्रकरण काशीरामच्या खुनाचे : कुत्र्यांमुळे फुटले बिंग

तुमसर (जि.भंडारा) : देव्हाडी येथील काशीराम कुकडे याचा खून करण्यासाठी उपयोगात आणलेली टिकास आणि फावडे तुमसर पोलिसांनी शनिवारी सकाळी काशीरामचा मेहुणा संजय पंचबुद्धे याच्या खैरलांजी येथील घरुन जप्त केला.

फेब्रुवारी २0१३ मध्ये काशीराम कुकडेचा पत्नी शीला, मुलगा संतोष आणि मेहुणा संजय पंचबुद्धे या तिघांनी मिळून फावड्याने खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी या तिघांनीही घरातच खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला.

पाच महिन्यानंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढून हाडे तलावात फेकून दिली. दरम्यान हे घर खचले. खचलेल्या घरातून मोकाट कुत्र्यांनी कपडे व अन्य साहित्य बाहेर आणले. गावकर्‍यांनी घरात डोकावून पाहिले असता त्यांना खड्डा दिसला. पोलिसात तक्रार झाली. पोलिसांनी खड्डा खोदला. त्यात मानवी हाडे निघाली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी काशीरामची पत्नी शीलाचा शोध घेऊन तिला रायपूरहून ताब्यात घेतले. २४ तासानंतर तिने खुनाची कबुली दिली आणि या प्रकरणातील सत्य उघडकीस आले.

आरोपींच्या बयाणानंतर त्यांनी दाखविलेल्या ठिकाणी देव्हाडी गाव तलावातून पोलिसांनी विखुरलेल्या स्थितीतील हाडे हस्तगत केली.

या प्रकरणात तुमसर पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध भादंवि ३0२, २0१ कलमान्वये गुन्हे दाखल केले असून तिघांनाही तुमसर न्यायालयाने २९ मे पर्यंंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Khiranganji decisis, shovel seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.