पंचवटीनगरात खीर वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST2021-02-23T04:12:21+5:302021-02-23T04:12:21+5:30
नागपूर : ख्वाजा गरीब नवाज (र.अ.)च्या वार्षिक ऊर्सच्या पर्वावर उत्तर नागपूरच्या प्रभाग क्रमांक ५ पंचवटीनगरमध्ये खीर वितरित करण्यात आली. ...

पंचवटीनगरात खीर वितरण
नागपूर : ख्वाजा गरीब नवाज (र.अ.)च्या वार्षिक ऊर्सच्या पर्वावर उत्तर नागपूरच्या प्रभाग क्रमांक ५ पंचवटीनगरमध्ये खीर वितरित करण्यात आली. इरफान अली यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उत्तर नागपूर युवक काँग्रेसचे महासचिव शेख शाहनवाज, साजिद शेख, इमरान अली, उबैद खान, राजा, आमीर अली, समीर, फुरुकान अली, अयान खान, सनाया परवीन यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यू लक्ष्मीनगरात आरोग्य शिबिर
नागपूर : जरीपटका येथील सच्चो सतरामदास सेवा मिशनच्या वतीने झिंगाबाई टाकळी, न्यू लक्ष्मीनगर स्थित हनुमान मंदिरात नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. राम थारवानी यांनी मार्गदर्शन केले. वर्तमान स्थितीचा आढावा घेता, आरोग्यप्रती सजगता अतिशय महत्त्वाची आहे. निष्काळजीपणाने बरेच आजार वेगाने पसरत असल्याचे ते म्हणाले. सेवा कर्म, दान धर्म करत मिशनच्या वतीने परिसरात २०१४ पासून नि:शुल्क शिबिराचे आयोजन केले जात आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक दादा घनश्यामदास कुकरेजा, दर्शन थारवानी, अनिल सेवानी, किशोर रहिजा उपस्थित होते. शिबिरात १८९ रुग्णांनी आरोग्याची तपासणी केली.
आहुजा अध्यक्ष तर ददलानी सचिव
नागपूर : विश्व सिंधी सेवा संगम, नागपूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप मोटवानी यांनी केली. मोटवानी यांनी अध्यक्षपदी मनोहरलाल आहुजा यांची नियुक्ती केली. अध्यक्ष आहुजा यांनी पुढील कार्यकारिणी जाहीर केली. उपाध्यक्षपदी बलराम ककवानी, भगवानदास नागरानी, खुबचंद आहुजा, मनोहरलाल प्रियानी, कोषाध्यक्ष सुनील मदनानी, सहकोषाध्यक्ष गोपाल मुलतानी, कार्यकारी सदस्य बलराम केसवानी, गुलाब भगतानी, हितेश थावानी, इंद्रलोक ननकानी, किशोर गोगीया, किशोर धिंगडा, मुरली रामरखयानी, नान धनकानी, पवन देवानी, रमेश साधवानी, सुनील दयाल शर्मा, सुरेश अमरनानी व विशनदास परसवानी यांची नियुक्ती करण्यात आली.
सिंधी पंचायतच्या अध्यक्षपदी चांदवानी
नागपूर : सुशिलानगर सिंधी पंचायतची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत सर्वसंमतीने कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी हितेश चांदवानी व उपाध्यक्षपदी राजकुमार सोनी यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव मनोज अंगनानी, सहसचिव राजेश बुधवानी, कोषाध्यक्ष प्रकाश खियानी, सदस्य अर्जुन जग्यासी, भिषमदास भाटीया, राजेश आहुजा, राहुल नैनानी, संजय फुलवानी, पंकज नानवानी, राजेश खत्री, निरज गंगवानी, दिनेश खियानी, दीपक होतलानी यांची नियुक्ती झाली.
अस्तित्व फाउंडेशनला पुरस्कार
नागपूर : मुंबईच्या हेल्पिंग हॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांच्या संकल्पनेच्या आधारावर वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या संस्थांना दरवर्षी नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा नागपूरच्या अस्तित्व फाउंडेशनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डोंबिवली येथील आदित्य सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात मराठी अभिनेता पंढरीनाथ कांबळे, प्रणव पिंपळकर, समाजसेवक आनंद पिंपळकर, मॉडेल रवी ठाकूर यांच्या हस्ते संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाउंडेशनकडून संस्थापक अध्यक्ष प्रकाश हेडाऊ व महिला मंडळ अध्यक्ष मंजू हेडाऊ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी समीर चव्हाण, गौरी पाटील, समीर पंडित उपस्थित होते.