खामला, गोकूळपेठ बाजारातील अतिक्रमण काढले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:44+5:302021-02-05T04:50:44+5:30

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी खामला व गोकूळपेठ बाजारातील अतिक्रमण काढले. बुधवारी शहरातील विविध परिसरातील ४५० अतिक्रमणे काढण्यात ...

Khamla, Gokulpeth market encroachment removed () | खामला, गोकूळपेठ बाजारातील अतिक्रमण काढले ()

खामला, गोकूळपेठ बाजारातील अतिक्रमण काढले ()

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी खामला व गोकूळपेठ बाजारातील अतिक्रमण काढले. बुधवारी शहरातील विविध परिसरातील ४५० अतिक्रमणे काढण्यात आली. पथकाने ८ ट्रक साहित्य जप्त करून, अतिक्रमणधारकांकडून ७३,८०० रुपयांचे दंड वसूल करण्यात आले.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत खामला रोडच्या दोन्ही भागातील २६ अतिक्रमणे काढण्यात आली. सोनेगाव येथील ममता कॉलनीत बनलेली अवैध झोपडपट्टी तोडण्यात आली. धरमपेठ झोनमधील गोकूळपेठ बाजारातील भाजीवाल्यांचे शेड तोडण्यात आले. हातठेले व दुकानांचे ३६ अतिक्रमण काढण्यात आले. लॉ कॉलेज चौक, अमरावती नाका, झोन कार्यालया दरम्यान ४६ अतिक्रमण साफ करण्यात आले. येथील अतिक्रमण करणाऱ्याकडून १३ हजाराची दंडात्मक वसुली करण्यात आली.

गांधीबाग झोनमध्ये नंगा पुतळा ते तीन नल चौकादरम्यान हातठेले व दुकानांची ३६ अतिक्रमणे काढून ३ ठेले जप्त करण्यात आले व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन ते पाचपावली फ्लायओव्हरच्या खालचे मांसविक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. राणी दुर्गावती चौक ते समर्पण रुग्णालय दरम्यान ३६ अतिक्रमण काढण्यात आले. दहीबाजार पूल ते शांतिनगर घाटादरम्यान ४६ अतिक्रमण काढण्यात आली. १ हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली.

लकडगंज झोन अंतर्गत ४४ अतिक्रमण काढून ११ हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली. आसीनगर झोन अंतर्गत ४४ अतिक्रमणे काढण्यात आली. मंगळवारी झोनमध्ये ४८ अतिक्रमणे काढून ३४०० रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली. हनुमाननगर झोन अंतर्गत मानेवाडा चौक, ओंकारनगर चौक, रामेश्वरी चौक, बेसा रोड दरम्यान ५४ अतिक्रमणे काढण्यात आली.

- अतिक्रमण करणाऱ्याने फोडले डोके

नेहरूनगर झोन अंतर्गत वाठोडा घाट परिसरात ४६ अतिक्रमणे काढण्यात आली. ८ हातठेले पथकाने जप्त केले. त्यानंतर गिड्डोबा मंदिर चौकात रस्त्यावर पडलेले साहित्य हटविण्यासाठी गेलेल्या पथकाला अतिक्रमणधारकांनी कारवाईस विरोध केला. दरम्यान, एकाने आपले डोके फोडून घेतले. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने पथकाने कारवाई स्थगित केली.

- दंड वसूल करून दिली सवलत

धंतोली झोन अंतर्गत मानेवाडा रोडवर सॅफरॉन हॉटेलचे निर्माण कार्य तोडण्यास गेलेल्या पथकाला हॉटेल मालकाने दोन दिवसांची सवलत मागितली. पथकाने हॉटेल मालकाला दोन दिवसांची सवलत देऊन २५ हजार रुपये दंडात्मक वसूल केले. हेरिटेज हॉटेललासुद्धा सवलत देताना त्यांच्याकडून १० हजार रुपये दंडात्मक वसूल करण्यात आले. दरम्यान, शताब्दी चौक ते त्रिशरण चौकादरम्यान ५६ अतिक्रमणे काढण्यात आली.

Web Title: Khamla, Gokulpeth market encroachment removed ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.