लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्षुल्लक वादातून गुन्हेगारांनी एका बारमध्ये तोडफोड करून गोंधळ घातला. तलवार आणि चाकूच्या बळावर गुन्हेगारांनी एका तरुणाला घेरले. परंतु ऐनवेळी पोलीस आल्यामुळे तरुणाचा जीव वाचला.सिंधी कॉलनी येथील प्रकाश तोतवानी यांचा खामला रोडवर आर. के. बार आहे. मंगळवारी रात्री शिवनगर झोपडपट्टी येथील गुन्हेगार संदीप ऊर्फ गप्पू समुंद्रे आपल्या साथीदारांसह बारमध्ये आला होता. बारमध्ये बसलेल्या दुसऱ्या एका ग्राहकाशी त्याचा वाद झाला. यावरून समुंद्रेने बारमध्ये गोंधळ घातला. बारमधील कर्मचाऱ्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने काही ऐकले नाही. आपल्या १०-१२ साथीदारांसह तोडफोड करून तो फरार झाला. दरम्यान दोन तरुणांंनाही त्यांनी घेरले होते. त्यांना जीवे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु त्याचवेळी पोलीस आल्याने समुंद्रे आपल्या साथीदारांसह पळाला. या घटनेमुळे खामला परिसरात तणाव निर्माण झाला आहे.समुंद्रे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची खामला परिसरात दहशत आहे. त्याचे बहुतांश साथीदार हे जुन्या खामला वस्तीतील असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मदतीनेच तो हल्ला करतो. तो व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली करतो. व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने अनेक हल्ले केल्याचेही सांगितले जाते. प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरातील खामल्यात बारमध्ये गुंडांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:49 IST
क्षुल्लक वादातून गुन्हेगारांनी एका बारमध्ये तोडफोड करून गोंधळ घातला. तलवार आणि चाकूच्या बळावर गुन्हेगारांनी एका तरुणाला घेरले. परंतु ऐनवेळी पोलीस आल्यामुळे तरुणाचा जीव वाचला.
नागपुरातील खामल्यात बारमध्ये गुंडांची तोडफोड
ठळक मुद्देचाकूच्या धाकावर तरुणाला घेरले