उधारी मागितल्यामुळे केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:52+5:302021-02-05T04:51:52+5:30

नागपूर : उधार घेतलेले ५० हजार रुपये मागितल्याने आरोपीने साथीदारांच्या मदतीने आनंद आडे यांची हत्या केली होती. आरोपी नवीन ...

Kelly murdered for asking for a loan | उधारी मागितल्यामुळे केली हत्या

उधारी मागितल्यामुळे केली हत्या

नागपूर : उधार घेतलेले ५० हजार रुपये मागितल्याने आरोपीने साथीदारांच्या मदतीने आनंद आडे यांची हत्या केली होती. आरोपी नवीन सोनी बऱ्याच दिवसांपासून वस्तीत गुंडागर्दी करीत होता, परंतु लोकांनी तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी कारवाई करू शकली नाही. आनंद आडे यांच्या हत्येनंतर आरोपीची गुन्हेगारी समोर आली.

नवीन सोनी याने साथीदारांच्या मदतीने २२ जानेवारीच्या रात्री जुनी शुक्रवारीत २८ वर्षीय आनंद आडे याची हत्या केली होती. कोतवाली पोलिसांनी नवीन सोनी, पंकज शेंद्रे, राहुल काळे, तसेच प्रवीण नेरकर याला अटक केले. आनंद फ्लॅक्स व नवीन लॅमिनेशनचे काम करीत होता. नवीन मूळचा झाशी येथील रहिवासी आहे. त्याचे कुटुंब १५ वर्षांपूर्वी येथे आले. आनंद व नवीन एकाच व्यवसायाशी जुळले असल्याने, एकदुसऱ्यांसोबत परिचित होते. काही दिवसांपूर्वी नवीन याने आनंदकडून ५० हजार रुपये उधार घेतले होते. आनंद त्याचे पैसे परत मागत होता. याच कारणाने दोघांमध्ये वाद सुरू होता. नवीनने पैसे परत न केल्यामुळे आनंदने त्याची मशीन स्वत:जवळ ठेवून घेतली होती. त्यामुळे नवीन संतप्त झाला होता. त्याने आनंदला पैसे देण्यासाठी वस्तीत बोलावून त्याची हत्या करण्याची योजना आखली.

नवीनने आपल्या मित्राला पूर्वीच आनंदची हत्या करण्यासाठी तयार केले होते. २२ जानेवारीच्या रात्री फोन करून पैसे देण्यासाठी आनंदला बोलाविले. आनंद त्याचा मित्र यश सावरकर याच्यासोबत दुचाकीवर नवीनच्या जुनी शुक्रवारी येथील घरी आला. येथे दोघांमध्ये वाद झाला. याचदरम्यान, नवीन व त्याच्या साथीदारांनी आनंदची हत्या केली. नवीनच्या विरोधात २०१८ मध्ये वस्तीत एका युवकावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो जुनी शुक्रवारीत गुंडेगीरी करीत होता. चाकूच्या धाकावर तो युवकांना धमकावित दाखवित होता. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतानाही नवीनच्या विरोधात पोलिसात कुठलीही तक्रार नव्हती. आनंद एकुलता एक मुलगा होता. नवीनच्या हत्याचा कट तो समजू शकला नाही. कोतवाली पोलिसांनी आरोपींना २९ जानेवारीपर्यंत कोठडीत घेतले आहे.

Web Title: Kelly murdered for asking for a loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.