प्रशिक्षणदक्ष राहा, गोपनीयता बाळगा
By Admin | Updated: May 13, 2014 00:54 IST2014-05-13T00:54:01+5:302014-05-13T00:54:01+5:30
कर्मचार्यांनी मतमोजणीच्या कामात दक्ष असावे आणि गोपनीयता बाळगावी, अशा सूचना मतमोजणी कर्मचार्यांना देण्यात आल्या.

प्रशिक्षणदक्ष राहा, गोपनीयता बाळगा
मतमोजणी : कर्मचार्यांना नागपूर : कर्मचार्यांनी मतमोजणीच्या कामात दक्ष असावे आणि गोपनीयता बाळगावी, अशा सूचना मतमोजणी कर्मचार्यांना देण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी कळमना मार्केटमध्ये होणार आहे. यासाठी कर्मचार्यांना सोमवारी येथील देशपांडे सभागृहात पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्णा, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे, उपविभागीय अधिकारी राहुल रेखावार, अविनाश कातडे, उमेश काळे, उपजिल्हाधिकारी संगीतराव, राम जोशी, आशा पठाण यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते. मतमोजणीचे काम जोखमीचे व राजकीय पक्षांसाठी संवेदनशील असल्याने कर्मचार्यांनी काम करताना दक्ष राहणे आवश्यक आहे. याशिवाय निवडणूक कामातील गोपनीयतेचाही भंग होऊ नये याचीही काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी कर्मचार्यांना देण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांनी सादरीकरणाद्वारे मतमोजणीच्या प्रक्रियेची माहिती दिली. मतमोजणीच्या वेळी निवडणूक निरीक्षक, निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक, सहायक आणि इतर कर्मचारी काम करणार आहेत. मतमोजणीस्थळी कर्मचार्यांनी मोबाईल फोन्स किंवा लॅपटॉप आणू नये, अशा सूचना कर्मचार्यांना देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा १५ मे रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)