असामाजिक तत्वांवर नजर ठेवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:09 IST2021-07-27T04:09:48+5:302021-07-27T04:09:48+5:30

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक अजय सादानी यांनी सोमवारी नागपूर विभागाचा वार्षिक पाहणी दौरा केला. दरम्यान त्यांनी प्रवाशांची ...

Keep an eye on antisocial elements () | असामाजिक तत्वांवर नजर ठेवा ()

असामाजिक तत्वांवर नजर ठेवा ()

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक अजय सादानी यांनी सोमवारी नागपूर विभागाचा वार्षिक पाहणी दौरा केला. दरम्यान त्यांनी प्रवाशांची सुरक्षा आणि असामाजिक तत्वांवर नजर ठेवण्याचे निर्देश आरपीएफच्या अधिकाऱ्यांना दिले.

महानिरीक्षक अजय सादानी यांना रिझर्व्ह लाईन येथे गार्ड ऑफ ऑनरचा सन्मान देण्यात आला. त्यानंतर त्यांनी अजनी परेड ग्राऊंडमध्ये साप्ताहिक परेडचे निरीक्षण केले. तेथे जवानांना परेड संबंधी आवश्यक सूचना दिल्या. तसेच आरपीएफ जवानांच्या सुरक्षा संमेलनात जवानांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मुख्यालयाच्या नियमांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अजनी येथील आरपीएफ बॅरॅक, कॅन्टीनचे निरीक्षण केले. त्यांनी नागपूर ठाण्याला भेट देऊन रेकॉर्डची तपासणी केली. रेकॉर्ड आणखी चांगला ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सीसीटीव्हीवरून असामाजिक तत्वांवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त कार्यालयाला भेट देऊन रेकॉर्डची पाहणी केली. तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

............

Web Title: Keep an eye on antisocial elements ()