काँग्रेसचा गड कायम ठेवा
By Admin | Updated: October 7, 2014 01:04 IST2014-10-07T01:04:42+5:302014-10-07T01:04:42+5:30
दक्षिण नागपुरातील मतदारांनी आजवर काँग्रेसला साथ दिली आहे. या वेळीही येथील सूज्ञ मतदार काँग्रेसलाच साथ देतील व दक्षिण नागपूर काँग्रेसचा गड असल्याचे सिद्ध करतील, असा विश्वास माजी मंत्री सतीश

काँग्रेसचा गड कायम ठेवा
दक्षिण नागपुरात रॅली : ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या शुभेच्छा
नागपूर : दक्षिण नागपुरातील मतदारांनी आजवर काँग्रेसला साथ दिली आहे. या वेळीही येथील सूज्ञ मतदार काँग्रेसलाच साथ देतील व दक्षिण नागपूर काँग्रेसचा गड असल्याचे सिद्ध करतील, असा विश्वास माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी व्यक्त केला.
दक्षिण नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांनी मोटरसायकल रॅली काढून प्रचार केला. रॅलीत काँग्रेसचे झेंडे घेऊन युवक सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी चतुर्वेदी यांना शुभेच्छा दिल्या. रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक वस्तीतील नागरिकांशी त्यांनी संपर्क साधला. ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. अडचणी सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. रॅलीत त्यांच्यासोबत अशोक धवड, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रशांत धवड, अमान खान, निमिषा शिर्के, शीला तराळे, शेवंता तेलंग, वासुदेव ढोके, प्रवीण आग्रे, सेवादल प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, गजराज हटेवार, अनिल वाघमारे, राजू भोतमांगे, विजय कदम, नीलेश खोरगडे, भेंडे, डॉ. सूर्यकांत मोरे, प्रवीण पोटे, विजय तेलंग, राजू खोपडे, समर्थ, प्रीती कदम, बाबा गावंडे, महेश बांते, प्रशांत डोंगरे, नरेंद्र भुरले, ललित बघेल, कांतिलाल सूर्यवंशी, उमाकांत जट्टेवार, एकनाथ काळमेघ, गजानन कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मतदारसंघात फिरत असताना ताजबाग परिसरात रॅली पोहोचली. परिसरातील शाही मशीद येथे पोहोचून चतुर्वेदी यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नियामत खान ताजी, जब्बारभाई बेग, लतीफ शेख, इब्राहिमभाई, निसार अहमद, हामीदभाई रस्सीवाले, मेहमूदभाई, जावेद सर उपस्थित होते. (प्रतिनिधी)