कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन लवकरच सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:42+5:302021-07-28T04:09:42+5:30
झिरो माईल्स स्टेशन पार करून कस्तूरचंद पार्क स्टेशनवर मेट्रो रेल्वेचा नियमित थांबा असेल. खापरीकडे जाण्याकरिता याच स्थानकावरून मेट्रोत बसता ...

कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन लवकरच सेवेत
झिरो माईल्स स्टेशन पार करून कस्तूरचंद पार्क स्टेशनवर मेट्रो रेल्वेचा नियमित थांबा असेल. खापरीकडे जाण्याकरिता याच स्थानकावरून मेट्रोत बसता येईल. स्टेशनचे बांधकाम मैदानाचे हेरिटेज महत्त्व लक्षात ठेवून केले आहे. बाह्य भागातील नक्षीकाम व कलाकृती हेरिटेज समितीच्या देखरेखीखाली केल्या आहे. स्टेशनच्या बाह्य भागातील बांधकाम आणि कस्तूरचंद पार्क मैदानातील पॅव्हेलियन एकाच रंगाचे असल्याने दोन्ही वास्तूत समानता जाणवते. स्टेशनच्या बाह्य भागात केलेले जाळीदार काम ४ हजार चौरस मीटरचे आहे. स्टेशनवर नवीन आणि ऐतिहासिक वास्तूंचा संगम बघायला मिळतो.
स्टेशनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन लिफ्ट असून रस्त्यावरून स्टेशनच्या कोनकोर्स भागात जाता येते. प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्याकरिता तशाच दोन लिफ्ट आहेत. प्रत्येक लिफ्टची क्षमता १३ प्रवाशांची आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन एस्केलेटरची असून त्यामुळे खालच्या मजल्यावरून थेट प्लॅटफॉर्मवर जाता येते. स्टेशनवर ५ किलो लिटर क्षमतेचे बायो-डायजेस्टर बसवले असून पुढे छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविले जातील.