शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karuna Munde : करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 11:26 IST

Karuna Munde : रविवारी परळीत दाखल होताच करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाटेतच त्यांची जीप अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठळक मुद्देया घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही. तेथे जे काही घडलंय, त्यावरुन कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय.

नागपूर - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांचा रविवारचा परळी दौरा वादग्रस्त ठरला. त्यांनी शहरात प्रवेश करताच मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करुन त्यांना घेराव घातला. दरम्यान, त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली. सायंकाळी करुणा शर्मांवर ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. याबाबत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायदा व सुव्यवस्थेचं चित्र स्पष्ट होतंय, असे फडणवीस यांनी म्हटलं. 

रविवारी परळीत दाखल होताच करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाटेतच त्यांची जीप अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. शर्मा व मुंडे समर्थक महिलांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. शर्मा यांना त्यांच्या गाडीत बसवून शहर ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या गाडीच्या झडतीत डिकीत पिस्तूल आढळले. ते पोलिसांनी जप्त केले आहे. शर्मा यांच्या गाडीच्या चालकाचीही चौकशी केली. त्यानंतर, आता गाडीत पिस्तुल ठेवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलं असून या घटनेची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही. तेथे जे काही घडलंय, त्यावरुन कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. हे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, विशेषत: गाडीत पिस्तुल ठेवल्याचा, हे अतिशय गंभीर आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, कुठल्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विशाखा घाडगे यांनी शर्मा व अरुण मोरे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, वैद्यनाथ मंदिरासमोर घाडगे यांना जातिवाचक शिवीगाळ का करता, असे विचारल्याने शर्मा यांनी बेबी तांबोळी यांना ओढून खाली पाडले तर अरुण मोरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर चाकूने वार केला. जखमी तांबोळींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाडगे यांच्या तक्रारीवरुन ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांन्वये गुन्हा नोंद झाला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल

करुणा शर्मा यांच्या चारचाकी गाडीतून पिस्तूल जप्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गाडीत आढळलेले पिस्तूल त्या व्यक्तीनेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेparli-acपरळीPoliceपोलिस