शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई अमित शहांसमोर खोटे बोलले, जयंत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 07:54 IST

बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे.

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अमित शहांनी मध्यस्थी केली असली, तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्यासमोर खोटं बोलल्याचा दावा जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केला.  

बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमाप्रश्नी बोम्मईंनी केलेले ट्विट्सही चर्चेचा विषय ठरले होते. या पार्श्वभूमीवर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेतली. याच बैठकीत बोम्मई यांनी वाद निर्माण करणारं ट्विट फेक असल्याचा दावा केला होता. या मुद्द्यावरून बुधवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी उपरोक्त दावा केला. मॉर्फ्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून संबंधितांची बदनामी होत असल्याचा मुद्दा बुधवारी अधिवेशनात चर्चेला आला. त्यावर चर्चा होत असताना, ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड आहे की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असल्याचा मुद्दा अशोक चव्हाण यांनी मांडला.   

जर महाराष्ट्राबाबत चिथावणी देणाऱ्या गोष्टी त्या अकाउंटवर असतील, तर आपण त्यावर काय भूमिका घेणार? ते व्हेरिफाइड अकाउंट आहे. त्यामुळे ते फेक आहे, असं सांगून आपण त्याची पाठराखण का करायची?, असा सवाल चव्हाण यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर सांगितलंय. मी स्वत: केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवेन’, असे सांगितले.    

जयंत पाटील यांचा दावा ‘बोम्मईंनी जे ट्विट केलंय, त्याबाबत कर्नाटकच्या विधानसभेत तासाभरापूर्वी चर्चा झाली. त्यांनी आपल्या ट्विट्सपासून घुमजाव का केलं? असा आक्षेप कर्नाटकच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे बोम्मईंचं ट्विट खरंच आहे. ते गृहमंत्र्यांसमोर जे बोलले, ते खरं नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे’, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

फडणवीसांचा टोला  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटील यांना खोचक शब्दांत टोला लगावला. ‘जयंत पाटील यांनी या विधानसभेत जास्त लक्ष द्यावं. कर्नाटकच्या विधानसभेत कमी लक्ष द्यावं. तिथे काय घडलं, याची खात्रीशीर माहिती घेऊ आणि मग त्यावर चर्चा करू’, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस