कऱ्हांडला,राजोली, हरदोली ग्रा.पं.वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:49+5:302021-02-05T04:42:49+5:30
कऱ्हांडला,राजोली, हरदोली ग्रा.पं.वर राष्ट्रवादी समर्थित गटाचे वर्चस्व; सरपंच पदाच्या निवडणुकीकडे लक्ष कुही: कुही तालुक्यात २४ ग्राम पंचायतीचे निकाल ...

कऱ्हांडला,राजोली, हरदोली ग्रा.पं.वर
कऱ्हांडला,राजोली, हरदोली ग्रा.पं.वर
राष्ट्रवादी समर्थित गटाचे वर्चस्व; सरपंच पदाच्या निवडणुकीकडे लक्ष
कुही: कुही तालुक्यात २४ ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. यानंतर कोणत्या गावात कोणत्या गटाचे वर्चस्व, यावर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. तालुक्यातील कऱ्हांडला, राजोली व हरदोली राजा या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले आहे. राजोली ग्रामपंचायतमध्ये दरवेळी ७ पैकी ३ किंवा ४ सदस्य अविरोध निवडून आलेले आहेत. यावेळेससुद्धा किती सदस्य हे अविरोध होतील, याकडे लक्ष लागले होते. म्हणून स्थानिक नेत्यांनी संपूर्ण ग्रा.पं.सदस्य बिनविरोध निवडून आणायचे,असा निश्चय केला. काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा ही ग्रा.पं. बिनविरोध व्हावी, असे वाटत असताना येथील एका उमेदवाराने निवडणुकीत आपले नामांकन कायम ठेवले. या ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य अविरोध निवडून आले व एका सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजहंस शेंडे विजयी झाले. राजोलीलगतच कऱ्हांडला ग्रामपंचायतीवर सात पैकी सातही जागांवर झेंडा फडकावला. राजोली हे गाव पुनर्वसित असून, अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. हरदोली राजा ग्रा.पं.मध्ये तीन सदस्य अविरोध निवडून आणले तर उर्वरित चार सदस्यही राष्ट्रवादी समर्थित गटाचे विजयी झाले आहेत. निवडून आलेल्यांमध्ये राजोली ग्रा.पं.मध्ये दिनेश रकतसिंगे,जयदेव लोहारे, राजहंस शेंडे, सुनीता लोगडे, सारिका देशपांडे, उषा दहिलकर, सुवर्णा हरडे यांचा कऱ्हांडला ग्रा.पं.मध्ये स्वप्नील मुळे, मंदा भांडे, मयुरी काकडे, पूजा भशारकर,पूनम भुडे,यशवंता काकडे,आशा भशारकर यांचा तर हरदोली राजा ग्रामपंचायतमध्ये मनोज कावळे, रेखा रामटेके, नंदा गडपायले,विशाल आडीकने हे राष्ट्रवादी समर्थित पॅनेलचे सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे आता या गावात होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.