शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात

By योगेश पांडे | Updated: June 3, 2025 21:53 IST

प्रोडक्शन वॉरंटवर चौकशीसाठी नेणार, सुनीता १४ मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली होती.

योगेश पांडे 

नागपूर : नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेल्या सुनीता हिला अटक करण्यासाठी कारगिल पोलिस नागपूरला पोहोचले. पोलिस तिला सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहे. तेथे तिची हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येईल.

सुनीता १४ मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली. ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक झुल्फिकारला भेटणार होती. याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले होते. चौकशीनंतर तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आले. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. ४ मे रोजी कपिलनगर येथील रहिवासी सुनीता तिच्या मुलासह बेपत्ता झाल्यानंतर तिच्याविरुद्ध बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अमृतसर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि तपास कपिलनगर पोलिसांकडे वर्ग केला होता.

या प्रकरणात कपिलनगर पोलिसांनी २८ मे रोजी सुनीताला ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला कारागृहात पाठविण्यात आले होते. चौकशीदरम्यान पाकिस्तानातील गिलगिट येथील रहिवासी झुल्फिकारसोबत स्टोन व्यवसायाबद्दल चर्चा करण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडल्याचा दावा तिने केला होता. यापूर्वी नोव्हेंबर २०२४ आणि मार्च २०२५ मध्येही तिला नियंत्रण रेषा ओलांडताना पकडले होते. सुनीताने दोन तासांत खडतर प्रवास पूर्ण केल्याने एनआयए व लष्कराच्या ती रडारवर आहे.म्हणूनच सर्वांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याबाबतचे सत्य जाणून घेण्यासाठी सुनिताची चौकशी करण्याचे ठरवले आहे. या संदर्भात, लडाख पोलिसांचे पथक मंगळवारी नागपूरला पोहोचले. तिला ताब्यात घेण्यासाठी त्यांचा एक पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला आणि एक पुरुष कर्मचारी आले आहेत. त्यांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला. बुधवारी प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर, सुनिताला चौकशीसाठी कारगिलला नेले जाईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPoliceपोलिस