तेजस्विनी विद्यालयात काेराेना चाचणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:47+5:302021-02-23T04:13:47+5:30

काेराडी : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या तसेच शाळांमध्ये काेराेनाचा शिरकाव लक्षात घेता काेराडी येथील तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आराेग्य ...

Kareena test camp at Tejaswini Vidyalaya | तेजस्विनी विद्यालयात काेराेना चाचणी शिबिर

तेजस्विनी विद्यालयात काेराेना चाचणी शिबिर

काेराडी : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या तसेच शाळांमध्ये काेराेनाचा शिरकाव लक्षात घेता काेराडी येथील तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आराेग्य विभागाच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांसाठी काेराेना चाचणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले. त्यात प्राथमिक आराेग्य केंद्र गुमथी येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल राऊत यांच्यासह आराेग्य विभागाच्या चमूने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची काेराेना तपासणी केली.

महादुला येथील श्रीवासनगर, फुलेनगर आदी भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. या परिसरातून या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता शाळेने खबरदारीचा उपाय म्हणून या शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे काेराेना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यावेळी डॉ. राहुल राऊत, बी. बी. खराबे, टी. बी. मिश्रा, जे. सी. यादव, दुर्वास नारनवरे, तंत्रज्ञ कृष्णा अवधूत आदी उपस्थित होते. शिबिराच्या आयाेजनासाठी मुख्याध्यापक मधुकर रेववकर, पर्यवेक्षक संदीप लोहकरे, अशोक दिवाने, ए. वाय. ढोबळे, एम. एस. वाडीभस्मे, शिशूपाल कनोजे, बी. डी. मेश्राम, राजेंद्र मोवाडे, संजय भोंगाडे, नरेंद्र लोही, गजानन महल्ले, चंद्रशेखर कोरडे, चरणदास उमाळे, देवानंद कुंभारे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Kareena test camp at Tejaswini Vidyalaya