काेराेना लसींचा साठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:57+5:302021-04-10T04:08:57+5:30
कळमेश्वर : शहरातील ग्रामीण रुग्णालयातील काेराेना लसींचा साठा संपल्याने शनिवारी (दि. १०) ग्रामीण रुग्णालयात काेराेना लसीकरण हाेणार नाही, अशी ...

काेराेना लसींचा साठा संपला
कळमेश्वर : शहरातील ग्रामीण रुग्णालयातील काेराेना लसींचा साठा संपल्याने शनिवारी (दि. १०) ग्रामीण रुग्णालयात काेराेना लसीकरण हाेणार नाही, अशी माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. कांचन वीरखेडे यांनी दिली.
दुसरीकडे, कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव केंद्रावर २० आणि धापेवाडा केंद्रात १० लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. दीपाली कुळकर्णी यांनी दिली. तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच या लसीबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्यात आल्याने ताे दूर करण्यासाठी व नागरिकांनी अधिकाधिक संख्येने ही लस घ्यावी, यासाठी जनजागृती माेहीमदेखील राबविली जात आहे. या माेहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लसीकरणाचा वेग थाेडा वाढला हाेता, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लस आवश्यक असल्याने कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयासाेबतच तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रे आणि लसीकरण केंद्रांवर लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.